सामान्य जनतेचा पैसा घेऊन नरेंद्र मोदी रस्त्यावर; काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

सामान्य जनतेचा पैसा घेऊन नरेंद्र मोदी रस्त्यावर; काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन

सोलापूर : सामान्य जनतेचा पैसा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. पेट्रोल - डिझेल दरवाढ विरोधात कॉंग्रेस एनएसययुआयच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावून, पेहराव करून लक्ष वेधून घेतले.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कॉंग्रेस एनएसयुआयचे गणेश डोंगरे, नगरसेवक विनोद भोसले, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला यांच्यासह एनएसयुआयचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.