सत्ता असताना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास कोणी अडवले?

सत्ता असताना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास कोणी अडवले?

solapur congress news

सोलापूर : सन 2016 -17 साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी दररोज पुरवठा करू असे अर्थपूर्ण शून्य आश्वासन देऊन पालिकेत भाजपाची सत्ता काबीज केली. सध्या विजयकुमार देशमुख हे सन 2009 पासून भाजप पक्षाचे आमदार आहेत. व त्यांनी आज पर्यंत शहराच्या विकास कामात किती योगदान दिले व किती मोठे प्रकल्प आणून शहराचा विकास केला हे जनतेस माहित आहे. मागील दहा ते बारा दिवसापूर्वी शहर मध्य  विधानसभेचे काँग्रेसचे आमदार कु. प्रणितीताई शिंदे यांनी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी माननीय आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक करून चर्चा केली. त्यानंतर आठ दिवसांनी आमदार साहेबांनी महानगरपालिकेत स्वतःच्या पक्षाची सत्ता असताना महापौर दालनात महापौर व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले पण निर्देश देउन दहा दिवस होऊनही त्यांच्या आदेशाला कराची टोपली दाखवली त्याचा अंमल झाले नाही. परंतु गेली 3 वर्षे सोलापूरचे उजनी धरण 100% टक्के भरले असताना शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची आठवण कशी काय झाली. दोन दिवसाआड पाणीपुरवठा  करण्यास आमदारास कोणी अडवले होते भर उन्हाळ्याच्या काळात शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडत होते. त्यावेळी आमदार साहेब तोंड बांधून गप्प का बसले होते. 

महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या गटबाजीच्या राजकारणामुळे शहराचा विकास करण्याऐवजी आमदार साहेबांनी स्वतःच्या गटाच्या नगरसेवकाच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालत होते व त्यांना महानगरपालिकेत मोठी पदे देऊन त्यांचा विकास केला हे जनतेला दिसत नाही काय? शहरात गेल्या 6 -7 महिन्यापासून पसरलेल्या कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीत आमदार साहेबांनी नागरिकांना मदत करण्याचे कुठेही दिसून आले नाही एवढे दिवस ते कोठे होते त्यांनी जनतेला सांगावे उलट कोरोना महामारी च्या संकटात आमदार प्रणिती ताई शिंदे पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आपले जीव धोक्यात घालून जनतेचे सेवा करत होते हे जनतेला चांगले ठाऊक आहे. 

सन 2009 -10 साली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय  गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी शहराच्या दळणवाढीस चालना देण्यासाठी बोरामणी येथे  आंतरराष्ट्रीय विमानतळ जमिन भूसंपादन करून व त्याचा मोबदला देऊन वेगाने काम करण्यास सुरुवात केली. पण स्वतः आमदार विजयकुमार देशमुख सन 2014 साली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असून केंद्रातील भाजप सरकार  व राज्यातील युती शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी न आणून विमानतळाचे काम बंद पाडले हे आमदार साहेबांना माहीत नाही काय? उलट महा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर आमदार प्रणितीताई शिंदे यांनी 50 कोटीचा निधी विमानतळासाठी मंजूर करून विमानतळाचे काम वेगाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी 50 कोटी निधीवर आपण टीका करीत आहात हे आमदार साहेबांना शोभते का आमदार साहेबांची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे. तसेच आपण परिवहन राज्यमंत्री पद सुद्धा असताना आपण आहे त्या एसटी स्थानकावर एकही विटचे बांधकाम केले नाही व जनतेला नवीन बस स्थानक उभे करून प्रवाशांना सोय करुन  देण्याचे बोगस आश्वासन दिले हे आमदार विसरले का? 

आपल्याच पक्षाचे नगरसेवक विकास कामात टक्केवारी मागतात असा जाहीर खुलासा आपल्या पक्षाच्या माजी महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता व तसाच सुर सध्याचे विद्यमान उपमहापौर करीत आहेत याबद्दल आमदार आत्तापर्यंत मौन बाळगून का आहेत. हे जनतेला समजले पाहिजे सध्या महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकांचे एकही काम वेळेवर होत नाही व त्यांना त्रासाला सोसावे लागते ही बाब सत्ताधारी भाजप पक्षाला भूषणार्थ आहे काय? सध्या आमदार साहेब पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुक जवळ आल्यामुळे आपण स्वतः पालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालून नागरिकांची सेवा करीत आहेत असे चित्र दाखवत आहेत. हे जनतेला कळले आहे. पालिकेतील भाजपच्या सत्ताधारी पक्षाने जनतेला जो त्रास दिला आहे त्याबद्दल जनता भाजप  सत्ताधारी भाजप पक्षाला माप करणार नाही व येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनताच भाजपला त्याची जागा दाखवेल असे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी म्हटले आहे.