ढेंगळे-पाटलांना सोडून महापौर, आयुक्तांनी केली स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी

ढेंगळे-पाटलांना सोडून महापौर, आयुक्तांनी केली स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी

सोलापूर - स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेले सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम, लक्ष्मीमार्केट येथील सुरू असलेले काम आणि पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, आयुक्त पी.शिवशंकर यांनी केली. स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी करताना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांना सोबत घेण्यात आले नाही, यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

लक्ष्मी मार्केट येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी करत असताना नागरिकांनी आपल्या येत असलेल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या. येत्या काळात लवकरच समस्या मिटिंग घेऊन आम्ही सोडवणार आहे. पार्क स्टेडियम हे लवकरच सुरू करावे अशी प्रतिक्रिया महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.

ईबीडी भागातील लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर मंदिर सुशोभिकरण आणि पार्क स्टेडियमचे काम हे काम कोणत्या स्टेजवर सुरू आहे याची पाहणी करावी अशी मागणी सभागृहनेत्यांनी केली होती. त्याची दखल घेत आज पाहणी करण्यात आली. पार्क स्टेडियम येथे काम हे अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर या स्टेडियमवर मॅचेस सुरू करावेत, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कामे हे संथ गतीने सुरू आहेत. लक्ष्मी मार्केट येथील नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर तत्काळ आपल्या समस्या मिटिंग घेऊन सोडवण्यात येथील असे अश्वासन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिले.

यावेळी तृटी असलेल्या कामाची माहिती घेऊन लवकरात लवकर हे काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.

यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, नगरअभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, झोन अधिकारी सारिका अकुलवार उपस्थित होते.