तलवार घेऊन आया है राजा..! मग पोलीस आले..

तलवार घेऊन आया है राजा..! मग पोलीस आले..

सोलापूर : तलवार घेऊन आया है राजा या गाण्यावर नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर केला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी हवालदार लक्ष्मण काळजे यांनी फिर्याद दिली आहे. वळसंग येथील यासीन कटरे, सोहेल कटरे व अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार गुरूवारी समोर आला. यासीनच्या शेतात हा प्रकार झाला. जिल्हाधिकारी यांनी कोवीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लावलेला जमावबंदीचा आदेश यासीन कटरे, सोहेल कटरे व अन्य सहा जणांनी मोडला.

यासीन याने हातात तलवार घेऊन सहा साथीदारांसह (आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग, झूमलो झूमलो) या गाण्यांवर व्हिडिओ बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले.