एकेकाळचा युनियन लीडर; बेवारसपणे दुर्दैवी अंत!

एकेकाळचा युनियन लीडर; बेवारसपणे दुर्दैवी अंत!

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते, प्रार्थना फाऊंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते यांनी एक भावनिक पोस्ट आपल्या फेसबुक वर शेअर केले आहे. एकेकाळी युनियन लीडर असलेल्या व्यक्तीचा बेवारसपणे दुर्दैवी अंत झाला आहे. 

प्रसाद मोहिते यांची पोस्ट पुढील प्रमाणे -  

दुर्दैवाने शेवटी त्यांचा मृत्यू झाला.....

प्रार्थना फाऊंडेशन च्या मनोबल या प्रकल्पाच्या माध्यमातून आज तागायत कित्तेक बेघर लोकांवर जे मरणाच्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला जीवन व्यथित करत होते अश्या लोकांचे उपचार केले, त्यांचा जीव वाचवन्याचा प्रयत्न केला,कित्येकांच्या शरीरात झालेल्या जखमांना आळ्या किडे पडून ते त्यांच शरीर पोखरत होत्या अश्या असहाय्य वेदना सोसत काही जण शेवटचे श्वास घेत होते त्यांचा ही जीव वाचवण्याचा प्रयत्न केला,त्यात काही जणांच्या जीव वाचला तर काहींचा मृत्यू सुद्धा.....

कित्तेक आजी आजोबा रास्ता चुकून महिनोन्महिने बेवारसाप्रमाणे जीवन जगत होते अश्या कित्तेक आजी आजोबांना त्यांच्या घरी पोहोच केलं..... पण कामाच्या व्यापात या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचवणे शक्य होत नाही ही घटना मागच्या महिन्यात घडली होती.

एकेकाळचे युनियन लीडर असणारे आजोबा आज त्यांचा दुर्दैवी अंत झाला.....

रोज येता जाता मी या आजोबाला रामराम करायचो,बोलायचो पण असा त्यांचा दुर्दैवी अंत होईल असं कधी वाटलं नव्हतं.सर्व नातेवाईक असून पण अंतर्गत कालहामुळे ते गेली तब्बल 30 वर्ष घरी गेले नाहीत ते रस्त्यावर बेवारसाप्रमाणे जीवन जगत होते.अंगावर नीट कपडे नाहीत,खायला जे मिळत ते,अंघोळ नाही,ऊन, वारा, पाऊस जो ऋतू असेल त्या सोबत ऍडजस्ट करून जगायला शिकले होते.त्यांची केस हिस्ट्री खूप मोठी सर्व सांगत नाही पण काही कारणास्तव त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता तेव्हा पासून ते असेच बेघर राहत होते.....

एके दिवशी मुकुंद सरांना ते आजारी आवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले,गायकवाड सरांकडून त्यांनी माझा नं घेऊन मला फोन केला पण मी कामानिमित्त बाहेर होतो त्यांनी सांगितलं की त्या आजोबांची तब्बेत खूपच खराब आहे त्यांना लवकरात लवकर उपचार मिळाला नाही तर त्यांचा मृत्यू होईल.आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो अंबुलन्स बोलावली,त्यांच्या अंगावर नीट कपडे नव्हते जे होते त्यातच त्यांनी शी, शु केली होती अंगाची दुर्गंधी सुटली होती आम्ही त्यांचे कपडे बदलले आणि त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेलो, कोविड मुळे बऱ्याच फॉर्मलिटी पूर्ण कराव्या लागल्या त्या रवी आणि मल्लेश दोघांनी पूर्ण केल्या.काही वेळानंतर उपचार सुरू ही झाले,तब्बेत बरी आहे असं वाटायला लागलं पण दोन दिवसांनी त्यांची तब्बेत जास्त खालावली आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.....

त्यांचे नातेवाईक घटनास्थळी आले होते,बऱ्याच केस मध्ये नातेवाईक जबाबदारी टाळतात मग अश्या वेळेस आपल्याच त्यांचे अंत्यविधी करावे लागतात पण आज पहिल्यांदा नातेवाईकांचा चांगला अनुभव आला त्यांच्या नागेवाईकांनी त्यांचा स्वीकार केला.पोस्टमार्टेम करून बॉडी ताब्यात घेतली आणि रुपाभवानी मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यात एक गोष्ट समाधानकारक होती की नातेवाईकांनी शेवटी का होईना त्यांचा स्वीकार केला पण एक माणूस म्हणून विचार केला तर एक व्यक्ती सर्वजण असताना एक व्यक्ती अस बेवारस जीवन जगत आहे ते ही रस्त्याच्या कडेला जी मिळेल ते खत हे मनाला भावनार नव्हत.....

असो आपण त्या आजोबांना वाचवण्यासाठी पुररेपूर प्रयत्न केला पण नशिबाच्या पुढे कुणाचाच काही चालत नाही आपल्या हातून जेवढी सेवा करता आली तेवढी केली....

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना.....

प्रसाद विठ्ठल मोहिते
टीम प्रार्थना फाऊंडेशन
9545992026/9049063829