महापालिका आयुक्तांसोबत सोलापूर विकास मंचची चर्चा! वाचा काय मांडले मुद्दे..  

महापालिका आयुक्तांसोबत सोलापूर विकास मंचची चर्चा! वाचा काय मांडले मुद्दे..  

सोलापूर शहराच्या खड्डेयुक्त अंतर्गत रस्त्यांमुळे जगभर होणारी बदनामीवर करा ठोस कार्यवाही

सोलापूर : स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना आणि फाइव्ह जी योजनांसाठी संपूर्ण सोलापूरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन त्यात भले मोठे खड्डे पडले आहेत. सर्वसामान्य सोलापूरकरांना शहरात वाहन चालवणे अत्यंत कठिण झाले आहे, सदर गोष्टींचा नाहक त्रास सामन्य नागरीकांपासून ते व्यापार्यांवर होताना दिसत आहे. सदर गोष्टींचा दिर्घकाळ दुष्परिणाम श्वासनाच्या आजारा पासून ते मणक्यांच्या इजा असे गंभीर परिणाम सोलापूरकरांच्या आरोग्यावर होत असून ह्यावर तात्काळ ठोस असे कार्य करावे अश्या सूचना सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना करण्यात आले.

सोशल मिडियावर सद्या सोलापूर प्रशासनाच्या वतीने हाथी घेण्यात आलेल्या चुकीच्या कामांविषयी सोलापूरातील नागरीक तिव्र भावना, व्यंग आणि विनोदी मिम्सच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. चांगल्या रस्त्यांची चाळण न होणे आणि त्यात खड्डा होऊ नये ह्या करिता सोलापूरातील ज्येष्ठ आणि अनुभवी सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूर महानगरपालिकेस सदैव सहकार्य करण्यास तयार आहेत त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा उपयोग ह्या करीता करावा आणि जगभरात सोलापूराची होणारी नाचक्की थांबवावी असा सूर सर्वसामान्य सोलापूरकर व्यक्त करित आहेत.

सर्वसामान्य नागरिकांना मुलभुत नागरी सोयी सुविधा पुरविण्यात केलेला हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जाचे काम हा दखलपात्र दंडनीय गुन्हा असून संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर ती कारवाई करावी अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली. सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी, अवेळी आणि विस्कळीत पाणीपुरवठा, बुलेट ट्रेन रद्द होणे, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आधांतरित निर्णय, ह्या आणि अश्या कैक कारणामुळे सोलापूरची जनता अक्षरशः वैतागली असून जनःशोभ वाढण्याच्या आत काहीतरी कठोर आश्वासक कार्य करण्याच्या सूचना सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, आनंद पाटील आणि विजय कुंदन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर यांना केल्या.