लंडनचा उद्योजक म्हणाला सोलापुरात उद्योग काढायचा आहे! परंतु..

लंडनचा उद्योजक म्हणाला सोलापुरात उद्योग काढायचा आहे! परंतु..

सोलापूर : बुधवारी पुन्हा सोलापूर विकास मंचचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेले होते. 

जिल्हाधिकारी मागील भेटी नंतर 7 दिवसात निर्णय घेऊन तुम्हाला कळवतो म्हणाले होते. त्यांच्याकडून कोणतेच उत्तर न आल्यामुळे 9 व्या दिवशी भेट घेतल्यावर त्यांनी स्पस्ट सांगितले. आचार सहिताचा ह्या चिमणी पडकामाशी काही संबंध नाही. मी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याने आपणास संपर्क करू शकलो नाही. उद्या मी निश्चित महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून आपणास कळवतो. त्यावर केतनभाई यांनी सांगितले त्या दोन्ही आयुक्तांना आपल्याकडून लेखी आदेश अपेक्षित आहे. त्याची काही गरज भासणार नाही मी उद्या आपणास नक्की सकारात्मक निर्णय देतो असे म्हणाले.

ह्या शिष्ठमंडळा सोबत खास लंडनहून एक उद्योजक आले होते. त्यांना सोलापूरात ग्रीन जसनरेटर चा उद्योग काढावयाचा आहे, परंतु विमानसेवा आपल्याकडे नसल्याने मी कलबुर्गी येथे जाऊन सर्व्हे करणार आहे कारण तेथून दिल्ली, मुंबई व बेंगलोर येथे थेट विमानसेवा चालू आहे. विमानसेवेमुळे करोडो रुपयांची गुतवणूक बाहेर जात आहे त्यांची व्यथा सुद्धा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर ऐकून घेतली व तुमचा संपूर्ण प्रोजेक्ट बाहेर घेऊन जाऊ नका आम्ही लवकरच इथे विमानसेवा सुरू करू असे सांगितले.

ह्या शिष्ठमंडळामध्ये माजी विमानतळ सल्लागार समिती चे केतनभाई शहा, गिरीकर्णिका चे विजय जाधव, वेक अप सोलापूर चे इंजिनीअर मिलिंद भोसले, उद्योजक संजय थोबडे, श्रीनिवास वैद्य, खास लंडनहून आलेले उद्योजक स्टेफोन गॅसस्प्रिंनी, पत्रकार सलालउद्दिन शेख हजर होते.