‘स्पेनका’ने निर्माण केला गुणवत्तेचा ब्रँड! : छत्रपती संभाजी महाराज

‘स्पेनका’ने निर्माण केला गुणवत्तेचा ब्रँड! : छत्रपती संभाजी महाराज

सोलापूर : सोलापूरचे युवा उद्योजक सुहास आदमाने यांनी स्पेनका उद्योग समूहाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या नव्या फ्लेवर्ड मिल्कचे बुधवारी लॉन्चिंग झाले. खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.


हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी मंचावर प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे प्रमुख यतीन शहा, बालाजी अमाईन्सचे प्रमुख राम रेड्डी, एलएचपीचे शरद ठाकरे, स्पेनका उद्योग समूहाचे प्रमुख सुहास आदमाने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य वितरक ओमप्रकाश कांकरिया, विलास आदमाने आदी उपस्थित होते.

खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि अन्य मान्यवरांनी फ्लेवर्ड मिल्कचे अनावरण केले. शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, यांच्यासह मंचावरील अन्य मान्यवरांनी स्पेनका उद्योग समूहाच्या वाटचालीचे कौतुक करून नव्या फ्लेवर्ड मिल्कचे स्वागत केले.

▪️ पहा स्पेनका फ्लेवर्ड मिल्कच्या लॉन्चिंगचा व्हिडिओ-

खासदार छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, ‘सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सुहास यांनी अतिशय कमी कालावधीत ब्रँड निर्माण केला आहे. त्यांनी कोणाशीही स्पर्धा न करता वेगळेपणा आणि गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे.’

▪️ स्पेनका फ्लेवर्ड मिल्कच्या लॉन्चिंगप्रसंगी शुभेच्छा देताना खासदार छत्रपती संभाजी महाराज.. पहा व्हिडिओ-

स्पेनका उद्योग समूहाचे प्रमुख सुहास आदमाने म्हणाले, ‘आज देशातील 6 राज्यात स्पेनकाची उत्पादने पोचली आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन हेच आमचे ध्येय आहे. भविष्यात अनेक उत्पादने आम्ही घेऊन येत आहोत.’

स्पेनका उद्योग समूहाच्या लोगो डिझाईन आणि ब्राउसरच्या आकर्षक मांडणीसाठी विराक्षी ॲडसचे विलास क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सचिन क्षीरसागर यांचा सन्मान खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. 

प्रारंभी स्पेनकाच्या चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर डॉ. किरण राजमाने यांनी स्पेनका उद्योग समूहाच्या वाटचालीची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जयेश दर्बी कलेक्शनचे गिरीश दर्बी, नगरसेवक विनोद भोसले, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे, सचिन खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्पेनका उद्योग समूहाला शुभेच्छा दिल्या.