टीसी म्हणाला.. मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे!

टीसी म्हणाला.. मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे!

सोलापूर : सोलापूरचे रहिवासी, उल्हासनगर महापलिकेचे सहायक आयुक्त सुर्यकांत खटके यांनी दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट फेसबुकवर केली आहे. स्पर्धा परीक्षा देऊन रेल्वेत टीसी झालेल्या जकराया दवले यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

श्री. सुर्यकांत खटके यांनी केलेली पोस्ट खालीलप्रमाणे - 

ह्याला खरे आनंदाचे क्षण म्हणतात..

वेळ रात्रीचे 12.. मी दिवाळी सुट्टीला कल्याणहुन सोलापूरकडे निघालो होतो. आपल्या 02115 सिद्धेश्वर एक्सप्रेसने सीट एस 2/28. माझ्या सीटवर मी झोपलो होतो. तेवढ्यात एक टीसी मास्क लावून माझ्या समोर आला आणि म्हणाला तिकीट प्लीज.. मी तिकीट नम्रपणे तिकीट दाखवले. तो म्हणाला सर तुम्हाला उठावे लागेल... मी म्हणालो उठावे लागेल? आता काय झाले तिकीट दाखवले की आता सीट वरून उठ का म्हणता.. तो म्हणाला मला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे. 
मी म्हणालो का?
तो म्हणाला तुम्ही माझी लाईफ बनवली आहे. मला क्षणभर कळेचना काय म्हणतोय हा.. तो म्हणाला सूर्यकांत खटके सर आहो.. मी तुमचा एमपीएससी क्लासचा विद्यार्थी जॅक... मास्क काढल्यावर मी ओळखले..आरे तू आहेस मित्रा जकराया दवले... माझा सोलापूरमधील एमपीएससीचा विद्यार्थी..
 मी एमपीएससी परीक्षा पास होऊन अधिकारी होण्यापूर्वी व झाल्यावर वेगवेगळ्या एमपीएससी अकादमीला शिकवायला जात होतो. सोलापूर स्टडी सर्कलला मी शिकवत असताना जॅक हा माझा विद्यार्थी होता.म्हणून बरेच विद्यार्थी मला सर म्हणतात... आज जॅकला भेटून खूप आनंद झाला. हा पण एक शेतकर्‍याचा मुलगा.. मन लावून अभ्यास करून कष्ट करून स्वतःच्या जिद्दीवर आज भारतीय रेल्वे मध्ये टीसी झाला आहे. त्याची सोलापूर पोस्टिंग आहे. विशेष म्हणजे जॅकची पत्नी आपल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. दोघांच्या सुखी संसाराला या दिवाळीनिमित्त खूप खूप शुभ आशीर्वाद... 

मी शिकवलेले विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागले आहेत आणि असे विद्यार्थी जेव्हा मी सरकारी ड्युटीवर पाहतो.. तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. मुलं जेव्हा असे भेटतात आणि सर म्हणतात तेव्हा मी जगातील सर्वात श्रीमंत व समाधानी स्वतःला मेहसुस करतो.

मित्रानो जॅकचे सोलापूर रेल्वे स्टेशन भारतातील चौथे व महाराष्ट्रातील पहील्या क्रमांकाचे स्वच्छ व सुंदर रेल्वे स्टेशन म्हणून भारत सरकारतर्फे निवडण्यात आले आहे. याचा आपल्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान असायला हवा. धन्यवाद.

"ह्याला खरे आनंदाचे क्षण म्हणतात" वेळ रात्री चे 12 am मी दिवाळी सुट्टी ला कल्याण हुन सोलापूर कडे निघालो होतो...

Posted by Suryakant Khatke on Thursday, 12 November 2020