बाबुराव नष्टे आणि शीला पतकी यांचा सन्मान; ‘स्वरताल’मधून युवा कलाकारांचे दमदार पाऊल

बाबुराव नष्टे आणि शीला पतकी यांचा सन्मान; ‘स्वरताल’मधून युवा कलाकारांचे दमदार पाऊल

swartaal program in solapur

सोलापूर : प्रतिवर्षाप्रमाणे नाट्य आराधना आणि सिध्दा पाटील स्मृती समितीच्या वतीने कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या व भरीव कार्य करणाऱ्या आणि सिध्दा पाटील यांच्याशी घनिष्ठ परिचय व स्नेहभाव असणाऱ्या दोन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने स्वरताल हा संगीताचा कार्यक्रम स्मार्ट सोलापूरकर युट्युब चॅनेल आणि फेसबुक पेजवर ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात आला.

यावर्षी संगीतप्रेमी आणि नाट्यप्रेमी श्री बाबुराव नष्टे आणि सेवासदनच्या माजी मुख्याध्यापिका आणि कलाकार शीला पतकी यांना ज्येष्ठ विधीज्ञ आणि कलाप्रेमी ऍ़ङ विजय मराठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर मुळ सोलापूरचे, पण आता संगीत शिक्षणासाठी पुणे येथे गुरूंचे मार्गदर्शन घेण्यासाठी स्थायिक झालेल्या सोलापूरच्या कलाकारांचा बहारदार कार्यक्रम झाला.

प्रारंभी युवा तबलावादक भरतेश तडवळकर यांचे तबलावादन झाले. त्यांना हार्मोनियमची साथ माधव लिमये यांनी केली. त्यानंतर निषाद व्यास यांचे सुमधुर गायन झाले. त्यांना तबलासाथ भरतेश तडवळकर, हार्मोनियम माधव लिमये आणि तानपुरा साथ चारूदत्त तडवळकर यांनी केली.

श्री भरतेश तडवळकर यांचे तबलावादनातील कौशल्य पाहता ते लवकरच आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍ़ङ श्री विजय मराठे यांनी व्यक्त केला. तर निषाद व्यास यांची गाण्याची समज आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारा आवाज, सोलापूरचे नाव जगभर पोहोचवेल यात कुठलीही शंका नाही असे शीला पतकी म्हणाल्या.

या कार्यक्रमाला ऍ़ङ आर. एस. तथा बाबू पाटील, मल्लिकार्जुन पाटील, उमेश पाटील, नागनाथ पाटील, तडवळकर गुरूजी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा गाडगीळ यांनी केले.

या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडीओ पहा...