धन्यवाद स्मार्ट सोलापूरकर; 28 दिवसात 1 कोटीच्या पुढे वाटचाल!

धन्यवाद स्मार्ट सोलापूरकर; 28 दिवसात 1 कोटीच्या पुढे वाटचाल!

THANK YOU

बातम्यांसह विविध अपडेट देत ट्रेडिंगमध्ये असलेल्या ‘स्मार्ट सोलापूरकर’ने सोलापूरच्या डिजिटल पत्रकारितेत आपला ठसा निर्माण केला आहे. गेल्या 28 दिवसात 1 कोटी पेक्षा जास्त लोकांपर्यंत स्मार्ट सोलापूरकर पोहोचले आहे. 

सोलापूर आणि परिसरातील नियमित घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय आणि गुन्हेगारीविषयक बातम्यांसह विविध अपडेट देत सामान्य नागरिकांचे प्रश्न ‘स्मार्ट सोलापूरकर’च्या माध्यमातून मांडले जात आहेत. सोलापूर शहर, जिल्हा, राज्य, देश आणि परदेशातूनही नेटिझन्सची पसंती मिळत आहे.

रिच आणि व्हीव्हर्स मिळवण्यासाठी इतरांसारखं काहीही न दाखवता, पोस्ट न करता निवडक बातम्या आणि अपडेट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या 28 दिवसात फेसबुकच्या माध्यमातून 1 कोटी पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचून ‘स्मार्ट सोलापूरकर’ने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. स्मार्ट सोलापूरकर डॉट कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब, इंस्टाग्राम आणि डेलीहंटवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि प्रतिसादामुळे हे शक्य झाले. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. 
धन्यवाद

- Smart Solapurkar
Digital Media