आषाढी एकादशीनिमित्त दीपक कलढोणे यांचा 'तुकोबांची अभंगवाणी' कार्यक्रम

आषाढी एकादशीनिमित्त दीपक कलढोणे यांचा 'तुकोबांची अभंगवाणी'  कार्यक्रम

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. २० जुलै सकाळी ८ वाजता दुर्वांकुर प्रस्तुत 'तुकोबांची अभंगवाणी' हा कार्यक्रम कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन माध्यमातून सादर होणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक, संगीतकार दीपक कलढोणे आणि सहकारी आपली गायन सेवा विठूरखुमाईचरणी अर्पण करणार आहेत.

भक्तीसंगीत आणि संत साहित्याच्या प्रचाराने सामाजिक मने संवेदनशील व्हावीत आणि सामाजिक ऐक्य वाढीस लागावे; समाजामध्ये परस्परांबद्दल प्रेम आणि निर्भेळ प्रेमच निर्माण व्हावे, या उद्देशाने सोलापुरातील पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार दीपक कलढोणे गेली पंधरा वर्षे अखंडपणे अभंगवाणीच्या माध्यमातून स्वरयज्ञ मांडत आहेत.

संत साहित्यावर आधारित विविध संकल्पना घेऊन ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, गायक दीपक कलढोणे आणि सहकलाकारांनी ही भक्ती चळवळ उभारली आहे. या कार्यक्रमांना प्रतिवर्षी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. गतवर्षी चौदाव्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेच्या सिॲटल मंडळासाठी अरविंद जोशी आणि दीपक कलढोणे यांना निमंत्रण मिळाले होते. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथूनच ऑनलाइन कार्यक्रम सादर केला..

दीपक कलढोणे यांच्या या अभंगगायन चळवळीचे यंदाचे सलग पंधरावे वर्ष आहे. यंदा संत तुकाराम महाराजांच्या रचनांवर अधारीत 'तुकोबांची अभंगवाणी' हा कार्यक्रम सादर होत आहे. यातील काही अभंग व गौळणींच्या रचना कलढोणे यांनी स्वतः संगीतबद्ध केलेल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम दीपक कलढोणे deepak kaldhone या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

Youtube Channel Link

https://youtube.com/channel/UCHlQ6AA5o5jPxxssvUuIYTg