वन्यजीव सप्ताहानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन | पहा व्हिडिओ- 

वन्यजीव सप्ताहानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन | पहा व्हिडिओ- 

सोलापूर : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून सोमवारी सिद्धेश्वर वनविहार या ठिकाणी पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव शशिकांत मोकाशी सर...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश शशिकांत मोकाशी, ॲड. सरोजिनी तमशेट्टी यांनी उपस्थित पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी केले. सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे यांनी आभार मानले. 

अ‍ॅड. सरोजनी तामशेट्टी मॅडम

कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, वनपाल शंकर कुताटे, रुकेश कांबळे, वनरक्षक श्रीकांत पाटील, महापालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, सरकारी वकील संतोष पाटील, वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश शिरसागर, वन्यजीव प्रेमी संस्थेचे प्रवीण जेऊरे, ग्रेट इंडियन बायोडायव्हर्सिटी संस्थेचे पंकज चिंदरकर, राजकुमार कोळी, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक मदन पोलके, कैलास जमादार, इको फ्रेंडली क्लबचे अजित कोकणे, अनिल जोशी, इको नेचारचे मनोज देवकर उपस्थित होते.