तुम्ही पाहिलंय का कधी असा संग्रह?  

तुम्ही पाहिलंय का कधी असा संग्रह?  

तुम्ही पाहिलंय का कधी असा संग्रह?  
देशविदेशांमधील मनगटी घड्याळांचा अनोखा संग्रह!
लहानपणापासून जोपासला छंद; 
दोन हजारापासून चार लाखांपर्यंतचे किमती घड्याळ संग्रहात  

 सोलापूर : अगदी झोपेतून उठण्यापासून रात्री झोपताना आलार्म लावण्यापर्यंत सारंकाही घड्याळावर अवलंबून असतं. दररोज वापरणार्‍या घड्याळाची आपण क्षणाक्षणाला मदत घेतो. मनगटावरचं छान, आकर्षक घड्याळ हे वेळेचं भान तर देतंच, पण त्याचबरोबर अापली शोभाही वाढवतं. मोबाइलमध्ये घड्याळ असते, म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे. असे असले तरी सोलापुरातील एका छंदिष्ट व्यक्तीने देशविदेशातील ब्रँडेड कंपनीच्या मनगटी घड्याळांचा संग्रह केला आहे.

व्यंकुसा अंबादास कनगिरी असे या संग्रहाचे नाव आहे. कन्ना चौक परिसरात राहणारे  ४७ वषीय व्यंकुसा यांचे घरगुती स्टील भांडी विक्रीचे दुकान चालवितात. गेल्या २० वर्षांपासून ते देशविदेशातील ब्रॅन्डेड मनगटी घड्याळांचा संग्रह करत आहेत. त्यांच्याकडे जवळपास अडीचशेहून अधिक मौल्यवान किमतीचे घड्याळ आहेत. 1970 पासून विविध छंदांचे संग्रह करण्यास सुरुवात केली. इबेर हार्ड या कंपनीचं पहिलं घड्याळ त्यांनी  खरेदी केलं. त्यानंतर त्यांना घड्याळ संग्रह करण्याचा छंद जडू लागला. बाहेर कुठेही फिरायला जाताच त्यांना घड्याळ दिसतात ते खरेदी करू लागले.  

सिटिझन स्लीम, जनिथ, पॅटा फ्लिप, ऑल्विन, अटोस, पिकोफाय, वेस्टर्न वॉच कंपनी, नॅनो, रोकर, दिनमार्टिन, कोरा,  रिको क्रिस्टल, राडो, ओमेगा, बुलोवा, लोनजींन, हॅमिल्टन, जीपी, झोडियाक, झेनिथ, सिटीझन, सिको आणि काही दुर्मिळ अश्या एच एम टी घड्याळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ए ते झेड अद्याक्षराने नाव (ब्रॅण्ड) असलेली घड्याळं व्यंकटेश यांच्या संग्रहात आहेत. विविध आकारात आणि  रंगांत ला हा संग्रह वैविध्यपूर्ण आहे.

आज व्यंकुसा यांच्याकडे २५० मनगटी घड्याळं आहेत. ज्यामधे भारतीय, स्विस आणि जपान मधील नावाजलेल्या घड्याळ कंपन्याची अनेक मॉडेल त्यांच्या संग्रहात आहेत. लिमिटेड एडीशन रॉयल एनफिल्ड घड्याळ संग्रहात आहे. दर वर्षी एक नवीन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न आहे. वल्गारी हे सर्वात महागडे घड्याळ त्यांच्या संग्रहात पाहायला मिळते. याखेरीज पोस्टाची तिकिटे आणि स्वातंत्र पूर्व भारतातील अनेक राज्यांच्या दुर्मिळ तिकिटं, दुर्मिळ नाणी तसेच भांडी, अडकित्ते, पानपुडे  यांचा व्यंकुसा यांच्याकडे संग्रह आहे.

मनगटी घड्याळ घातल्याने व्यक्तिमत्त्व खुलते  

मनगटी घड्याळ हे घातल्यानंतर व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. मला लहानपणापासून मनगटी घड्याळ्याचा संग्रह करण्याचा छंद आहे. थोडे कलरफुल आणि फ्रेश लूक देणारे, वेगवेगळ्या देशविदेशातील घड्याळे माझ्या संग्रहात आहेत. 

- व्यंकुसा कनकगिरी,

संग्रहाक