महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाला; जरांगेंच्या लढ्याला यश

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil GR News

सोलापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आज पहाटे अध्यादेश काढले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आंदोलन करत मुंबईत जमा झालेल्या मराठा बांधवांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ मुख्यमंत्री शिंदे सभास्थळी येणार आहेत. यावेळी जरांगे पाटील उपोषण सोडतील. वाशीच्या शिवाजी चौकात मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहण्यासारखा आहे. जवळपास सहा महिन्यांच्या आंदोलनाला आज यश आलं आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.

सरकारने काढलेला अध्यादेश पुढीलप्रमाणे –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button