सोलापुरात पहिल्यांदाच सापडले मेफेड्रीन!
Solapur Crime Branch mephedrine News
सोलापूर : सोलापूर शहरात पहिल्यांदाच मेफेड्रीनची कारवाई झाली आहे. गुन्हे शाखेचे पीएसआय अल्फाज शेख यांच्या पथकाने 11.870 ग्रॅम मेफेड्रीन जप्त केले आहे.
मेफेड्रीन प्रकरणात सलीम रशीद शेख (वय 33, रा. देशमुख – पाटील वस्ती, देगाव रोड, सोलापूर) याला गुन्हे शाखेने अटक करण्यात आली आहे. देगाव रोड येथील देशमुख पाटील वस्तीमध्ये राहणारा सलीम हा मेफेड्रीनची विक्री करत होता. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. सलीम याला ताब्यात घेतले. सलीमकडे विक्रीकरिता ठेवलेले 29 पाऊचमध्ये 11 ग्रॅम 870 मिलिग्रॅम वजनाचे मेफेड्रीन सापडले. याची अंमली पदार्थांच्या मार्केटमध्ये 29 हजार 675 रुपये किंमत आहे.
गुन्हे शाखेने केलेली कामगिरी कौतुकास्पद असली तरी मिळालेले मेफेड्रीन खूपच कमी आहे. सलीम याने मेफेड्रीन मुंबई येथून विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त एम राज कुमार, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दीपक किर्दक, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे, अर्चना स्वामी, शिलावती काळे, सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.