राम सातपुतेंनी घेतले जगदगुरुंचे आशिर्वाद
सोलापूर : सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी काशीपीठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आमदार राम सातपुते यांनी अक्कलकोट रस्त्यावरील होटगी मठातील पंचमुखी परमेश्वर मंदिरात पूजा केली. यानंतर काशीपीठाचे जगदगुरू श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींची भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी काशीपीठाचे जगदगुरू
जगदगुरू श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख आणि भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांची काही काळ चर्चा झाली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक नागेश भोगडे, बिपिन धुम्मा, चिदानंद मुस्तारे, शशिकांत रामपुरे, सिद्धाराम दुधनी, बसवराज गंदगे आदी उपस्थित होते.