दांडेलीत वॉटर स्पोर्ट्स आणि धमाल भटकंती
इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम, सोबतच रिव्हर राफ्टिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद
सोलापूर : निसर्गरम्य दांडेली परिसरात इको फ्रेंडली क्लबने भटकंती आयोजित केली होती. सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उन्हाळी भटकंतीचा आनंद लुटला. यासोबतच विविध वॉटर स्पोर्ट्स् करत एडवेंचर अनुभवले. या उपक्रमात ४५ हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला.
शुक्रवार दि. १७ मे रोजी सायंकाळी इको फ्रेंडली क्लबची टीम दांडेलीकडे रवाना झाली. शनिवारी सकाळी सर्व निसर्गप्रेमी दांडेलीतील जंगल बेल या रिसॉर्टवर पोचले.
फ्रेश होऊन सर्वांनी चहा नाश्ता केला. त्यानंतर सर्वजण बस प्रवास करत ऍक्वा वूड अडव्हेंचर येथे पोचले. त्याठिकाणी सर्वांनी झिप लाईन या एडवेंचर ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतला.
सोलापुरातल्या अतिशय कडक उन्हातून जाऊन दांडेली येथे काली नदीत वॉटर स्पोर्ट्स करून सर्वजण आनंदून गेले. त्यानंतर सर्वांनी दुपारचे जेवण केले.
त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण रिसॉर्टवर आले. सर्वांनी रिसॉर्टवर स्विमिंगपूलमध्ये धमाल मस्ती केली. जंगलाशेजारी असलेल्या रिसॉर्टवर सर्वांनी पाऊस अनुभवला. रात्रीचे जेवण करून सर्वांच्या गप्पा रंगल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वजण जंगल भटकंतीसाठी निघाले. दांडेलीच्या जंगलात फिरून सर्वांनी आनंद व्यक्त केला.
याठिकाणी सर्वांनी सामूहिक पद्धतीने ‘इतनी शक्ती हमें दे न दाता’ हे प्रार्थना म्हटली. रिसॉर्टवर परत येऊन सर्वांनी चहा नाश्ता केला. त्यानंतर सर्वजण मौलंगी पार्क जवळील गो कार्ट येथे पोचले. सर्वांनी गो कार्ट खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वांनी मौलंगी पार्कला भेट दिली.
बस प्रवास करून सर्वजण ऍक्वा वूड अडव्हेंचर येथे पोचले. येथे विविध वॉटर स्पोर्ट्सचा सर्वांनी आनंद घेतला. बोटिंग, कायाकिंग, जॉरबिंग असे वॉटर स्पोर्ट्स सर्वांनी एन्जॉय केल्या. त्यानंतर सर्वांनी दुपारचे जेवण केले.
दुपारचे जेवण करून सर्वांचा परतीचा प्रवास सुरु झाला. हुबळी येथील श्री बसवेश्वर खानावळ येथे सर्वांनी रात्रीचे जेवण केले. पहाटे सर्वजण सोलापुरात परतले.
इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक अजित कोकणे, सदस्य संतोषकुमार तडवळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, पूजा शेरखाने कोकणे, शिल्पा तडवळ, अथर्व तडवळ, शशिकला गायकवाड, आशा चिंचकर, अनिल चिंचकर, सिद्धी सरतापे, मयुरी जोशी, नील जेऊरकर, तृप्ती जंगम, मानसी जेऊरकर, तनिष्का जंगम, शिल्पा जेऊरकर, शर्वय जेऊरकर, संतोष भोसले, प्रतिज्ञा भोसले, विजया कवठाळकर, संजय कवठाळकर, सोहम निरगुडे, श्रीया निरगुडे, नेहा शर्मा, अजित डोंगरकर, आरुष डोंगरकर, श्रवण डोंगरकर, पंडितराव गावंडे, प्रगती गावंडे, डॉ. सरला होले – पाटील, रुपाली पाटील, शार्दुल पाटील, संजय टोळे, डॉ योजना टोळे, मकरंद काडगावकर, सुनील जाधव, अजय घटे, कृष्णदेव खंडागळे, मंजुश्री खंडागळे, ज्योती खंडागळे, किशोरी जोशी, अक्षया प्रवीण शहा, युक्ता राजेश जोशी, साईराज देशपांडे यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
ही निसर्ग भ्रमंती आनंददायी होण्यासाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ चडचणकर, जगदीश चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस चालक समीर मस्के, सहाय्यक आतीश तांबे यांचे सहकार्य लाभले.
#dandeli #watersports #EcoFriendlyClub #Solapur #riverrafting #karnataka #tour #Trekking