निसर्गप्रेमींनी बनवले हजारो ‘सीड बॉल’
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इको फ्रेंडली क्लब आणि वनविभाग सोलापूर यांच्यावतीने ‘सीड बॉल’ बनवण्याची कार्यशाळा
सोलापूर : पर्यावरण दिनाच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर वनविहार, सोलापूर येथे इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने आणि वनविभाग सोलापूर यांच्या सहकार्याने सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
आधी माती आणि शेणखत एकत्र केले. माती मळून झाल्यावर त्याचे गोळे बनवले. त्यात वेगवेगळ्या बिया घालून सीड बॉल बनवले. वाळलेले सीड बॉल सायकलिंग, निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान टाकायचे. हे सीड बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल, अशी ही संकल्पना असल्याचे वसुंधरा मित्र, इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी सांगितले.
सोलापूर वन विभागाचे प्रमुख उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी शंकर कुताटे, श्रीशैल पाटील यांनी सीड बॉल कार्यशाळेस उपस्थित राहून निसर्गप्रेमींना प्रोत्साहन दिले.
सीड बॉल बनवून झाल्यानंतर सर्वांनी घरून बनवून आणलेल्या जेवणावर ताव मारत वनभोजनाचा आनंद घेतला. नर्सरी आणि नवीन पॅगोडा परिसरात मस्त फोटोग्राफीही केली.
या उपक्रमात इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, देवाशीष शहा, किशोरी शहा, अक्षया शहा, संजय टोळे, डॉ. योजना टोळे, नीता चिपडे, सलोनी चिपडे, सहीषा चिपडे, प्रा. शर्मिला करपे, गिरीश घोगले, उमा घोगले, सरस्वती कोकणे, पूजा कोकणे आराध्या कोकणे, परिचिता शहा, स्वरित शहा, अर्णव शहा, प्रेमा कुंभार, सचिन कांबळे, ओम गायकवाड, आकाशवाणीच्या निवेदिका कविता वाघमारे, सचिन पवार, सनसिटी येथील डॉ. कीर्ती गोलवलकर आणि त्यांच्या टीमने उत्साहाने सहभाग नोंदवला. वनविभाग सोलापूरचे कर्मचारी विक्रम सरवदे, शंकर, प्रवीण जेऊरे यांचे सहकार्य मिळाले.