गुन्हे वृत्त

पोलीस हवालदाराने स्वीकारली 10 हजारांची लाच

The police constable accepted a bribe of 10 thousand

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : दाखल गुन्ह्यात अटक न करता, फक्त चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरवी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस हवालदार किरण देविदास म्हेत्रे व खाजगी इसम रोहित गवड यांना बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

उभयतांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार व त्याच्या मामे भावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्या गुन्ह्यात अटक न करता चॅप्टर केस करून सोडून देण्यासाठी पोलीस हवालदार किरण म्हेत्रे (बक्कल नं.४२३, नेमणूक – विजापूर नाका पोलीस ठाणे) यांनी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांच्याकरिता २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर, २४ जून रोजी त्या तक्रारीवर पडताळणी झाली. मंगळवारी, २५ व २६ जून रोजी रचलेल्या साखळ्यात तडजोडीअंती पोलीस हवालदार किरण मेहत्रे यांच्याकडून ठरलेली १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम नागेश गवड (वय. ३३ वर्षे रा.३०४, दक्षिण कसबा सोलापूर) याला रंगेहात पकडण्यात आलं. दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (लाप्रवि, पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले.

ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक श्री. उमांकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोह/शिरीषकुमार सोनवणे, पोहवा/श्रीराम घुगे, पोह/अतुल घाडगे पोशि/रवि हाटखिळे, चालक पोह/राहुल गायकवाड (सर्व नेमणुक : अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

….आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी रंगभवन चौक सोलापूर. संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल www.acbwebmail@mahapolice.gov.in ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
संपर्क टोल फ्री क्रमांक १०६४ दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००

Related Articles

Back to top button