सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

क्रूरता! अन् त्याने श्वानाला पाण्यात ढकलले..

On: July 12, 2024 1:14 PM
Follow Us:
---Advertisement---

परशुराम कोकणे

सोलापूर : सोलापुरातील तरुणाने एका श्वानाला कारण नसताना सिद्धेश्वर मंदिर परिसरातील तलावातील पाण्यात ढकलून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरस झाला आहे. या घटनेनंतर सोलापुरातील प्राणीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण कारण नसताना श्वानाला तलावामध्ये ढकलून देत आहे. याचा रील करून तरुणाने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

सोलापुरातील प्राणीप्रेमी ॲड. स्वप्नाली चालुक्य यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ॲड. स्वप्नाली चालुक्य यांना पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारची तक्रार नोंदविता येणार नाही असे म्हणून पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली.

श्वानाला पाण्यात ढकलल्याचा Viral Video –

या घटनेसंदर्भात ॲड. स्वप्नाली चालुक्य यांनी वसुंधरा मित्र, स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांच्याशी संपर्क साधला. परशुराम कोकणे यांनी तत्काळ पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. झालेली घटना चुकीची असून तरुणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले आहे.

वाचा पोलिसात दिलेली तक्रार –

Animal lover Advocate swapnali chalukya solapur

Police officer Vijay kabade

Crime reporter Parshuram Kokane

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now