नात्यातील कटूता तडजोडीमुळे संपते : ॲड. अंत्रोळीकर-शहा
Family Court Program R M Antrolikar Shaha News
सोलापूर : न्यायालयातील दोन्ही पक्षकारांमधील वाद जर कोणी मध्यस्थी करून सोडविले तर ते सोपे जाते व दोनही पक्षकारांमधील असलेले नाते संबंधातील कटूता तडजोडीमुळे संपून जाते असे, मत कौटुंबिक न्यायालय, सोलापूर येथे मध्यस्थी या विषयावर आयोजीत केलेल्या चर्चासत्रात विधिज्ञा आर. एम. अंत्रोळीकर यांनी व्यक्त केले.
न्यायालयात दिर्घकाळ खटला चालवून न्याय मिळवायला बराच कालावधी लागतो. त्यामुळे पक्षकारांनी आपापसातील वाद मध्यस्थीमार्फत जर सोडविले तर पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो तसेच त्यांचा मानसिक त्रास कमी होतो. सध्या न्यायालयात प्रचंड प्रमाणात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्याही कमी होण्यास यामुळे मदत होते असे मत मा. प्रमुख न्यायाधीश सौ. के. डी. शिरभाते यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या चर्चासत्रासाठी व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती. आर.एम. अंत्राळीकर-शहा यांचा सत्कार श्रीमती. के. डी. शिरभाते यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती. के. डी. शिरभाते, न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय, सोलापूर व प्रमुख पाहुणे श्री. एन. एम. स्वामी, अध्यक्ष बार असोसिएशन कौटुंबिक न्यायालय, सोलापूर तसेच श्रीमती. एन. डी. मुलवाड, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक हरिदास पोटाबत्ती यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. एन. एम. स्वामी यांनी मानले. या कार्यक्रमास बहुसंख्य पक्षकार, विधिज्ञ श्री. तुपडे, श्रीमती. डोके, निलंकठ स्वामी, श्री.डि.एस. नागटाळे, श्री.एस.सी