सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

गोव्यात सोलापूरकरांनी केली धमाल!

On: September 25, 2024 9:17 AM
Follow Us:
---Advertisement---

चडचणकर ट्रॅव्हल्स आणि इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; डोनापावला बीच, कलंगुट बीच, साऊथ गोवा, नॉर्थ गोवा, शांतादुर्गा मंदिर, मंगेश मंदिर, अगोडा किल्ला याठिकाणी भटकंती

सोलापूर : सोलापुरातील निसर्गप्रेमींनी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. ही भटकंती इको फ्रेंडली क्लब आणि चडचणकर ट्रॅव्हल्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.

19 सप्टेंबर 2024 रोजी सोलापुरातून प्रवासाला सुरुवात झाली. 20 सप्टेंबर रोजी सकाळी सर्वजण गोव्यातील पणजी याठिकाणी पोचले.

पहिल्या दिवशी हॉटेलवर पोचून सर्वजण फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी नाष्टा केला. त्यानंतर बसमध्ये बसून सर्वजण डोनापावला बीचवर गेले. याठिकाणी फोटोसेशन झाले.

या परिसरात सिंघम तसेच एक दुजे के लिए या चित्रपटांचे शूटिंग झाल्याचे गाईडने सांगितले. त्यानंतर पुन्हा सर्वजण बस मध्ये बसून हॉटेलवर परतले. दुपारचे जेवण झाले त्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन सर्वजण पुन्हा बसमध्ये बसून कलंगुट बीचवर दाखल झाले.

बीचवर आल्यानंतर सर्वजण समुद्रकिनारी फिरण्याचा मनमुराद आनंद लुटला. मस्त फोटोसेशन झाले. काहीजणांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वांनी समुद्रकिनारी सुंदर सूर्यास्त पाहिला. त्यानंतर कलंगुट बीच परिसरातील मार्केटमध्ये खरेदीचा आनंद घेतला.

सूर्यास्त पाहून झाल्यानंतर सर्वजण पुन्हा बस मध्ये बसून हॉटेलवर परतले. रात्रीचे जेवण करून सर्वांनी मुक्काम केले.

भटकंतीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून फ्रेश होऊन चहा घेतल्यानंतर सर्वजण मीरामार बीचवर दाखल झाले. बीचवर काहीच गर्दी नव्हती. काहीजण पाण्यात बसून समुद्राचा आनंद घेत होते तर काहीजण बीचवर पसरलेल्या वाळूत चालून आनंद घेत होते.

Next Trek –

त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि एनजीओ तर्फे बीच क्लिनिंगनिमित्त स्वच्छता अभियान चालू होते. या उपक्रमात इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनीही सहभाग नोंदवला आणि समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली.

https://www.youtube.com/watch?v=5_U3OJbykkM

त्यानंतर पुन्हा हॉटेलवर येऊन सर्वजण फ्रेश झाले आणि बस प्रवास करत सर्वांनी ऐतिहासिक अशा ओल्ड चर्च भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर सर्वजण बस प्रवास करत शांतादुर्गा मंदिर या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर बस प्रवास करत सर्वजण मंगेश मंदिर या ठिकाणी भेट दिली. दोन्ही मंदिरांना भेट देऊन सर्वांनी शांततेचा अनुभव घेतला. या दोन्ही मंदिरांचा परिसर अतिशय निसर्ग संपन्न आहे.

पुन्हा रूम कडे येऊनसर्वजण फ्रेश झाले. सर्वांना संध्याकाळच्या क्रूझवर जाण्याची उत्सुकता होती. पणजी परिसरातल्या क्रुझवर सायंकाळी सर्वजण मस्त एन्जॉय केले. याठिकाणी स्थानिक कलाकारांनी आपले नृत्य सादर केले. त्यानंतर सर्वांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नाचण्याचा आनंद घेतला. तासाभराच्या क्रूझ राईडनंतर सर्वजण आनंदून गेले.

पुन्हा रूमकडे येऊन जेवणानंतर सर्वांनी मुक्काम केला. भटकंतीच्या तिसऱ्या दिवशी सर्वजण सकाळी फ्रेश होऊन चहा नाष्टा केल्यानंतर बस प्रवास करत आगोडा फोर्ट याठिकाणी भेट दिली.

समुद्रकिनारी असलेल्या या किल्ल्याला भेट देऊन सर्वांना आनंद झाला. किल्ला भेटीनंतर पुन्हा एकदा सर्वजण हॉटेलकडे आले आणि सर्वांनी दुपारचे जेवण केले. दुपारच्या जेवणानंतर परतीचा प्रवास सुरू झाला.

 

चडचणकर ट्रॅव्हल्सचे संचालक जगदीश चढचणकर आणि सोमनाथ चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांनी भटकंतीचे नेतृत्व केले.

गोवा भटकंतीमध्ये गंगुबाई कोकणे, सरस्वती कोकणे, पूजा कोकणे, आराध्या कोकणे, निवेदिता नवींदगीकर, अरुणा कुलकर्णी, कस्तुरी येळगे, रजनी करंजकर, शैलजा घाटे, शशिकला गायकवाड, सौ. उमा गिरीश घोगले, गिरीश प्रभाकर घोगले, परिचिता अपूर्व शहा, स्वरित अपूर्व शहा, शब्बीर सय्यद, हुसेनबी सय्यद, झेबा सय्यद, शाहिद सय्यद, सचिन कांबळे, मीना कांबळे, पांडुरंग दुधगुंडी, सौ. पार्वती दुधगुंडी, प्रेमा कुंभार, ॲड. साधना काकडे, रोहन कोटा, वर्षा कोटा, सौ. सपना वडनाळ, अंबादास वडनाळ, सुरज राठोड, निकिता राठोड, मकरंद काडगावकर, शुभदा काडगावकर, श्रेया केसकर आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

या भटकंतीसाठी चडचणकर ट्रॅव्हल्सचे टूर मॅनेजर प्रशांत दहीहंडे, चालक दत्ता तोडकर, चालक पुजारी, सहाय्यक प्रमोद गुमटे, जेवण विभागाचे प्रमुख श्री रमेश काका आणि त्यांच्या टीमचे तसेच हॉटेल सेलटॉपच्या अनुष्का मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now