देशातील सर्वात मोठ्या दांडियामध्ये ‘स्पाईस एन आईस’ने फडकवला महाराष्ट्राचा झेंडा!
सोलापूर : नवरात्रीनिमित्त ठीकठीकाणी खूप मोठ्या प्रमाणावर दांडियाचं आयोजन होत असतं. दैनिक भास्कर आयोजित जयपूर, इंदोर आणि भोपाळ इथे झालेल्या अभिव्यक्ती दांडिया मध्ये टीम स्पाईस एन आईस नी अख्ख्या देशाला खास महाराष्ट्रीय चवीची मेजवानी दिली.
दरवर्षी स्पाईस एन आईस ची टीम या दांडियामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ सर्व्ह करते. 3 लाखापेक्षा जास्त लोक या दांडिया मध्ये सहभागी होतात. उत्तम दर्जा, अप्रतिम चव आणि नीटनेटकेपणा यामुळे मोस्ट हायजिनिक स्टॉल, बेस्ट फूड चं अवॉर्ड स्पाईस एन आईस टीम ला मिळतं.
देशातील सर्वात मोठ्या अभिव्यक्ती दांडिया मध्ये सहभागी होण्याचं हे स्पाईस एन आईस टीम च सहावं वर्ष आहे. जयपूर, भोपाळ आणि इंदोर येथे सर्व मिळून 45 जणांचा स्टाफ जातो. सोलापूरहून इतक्या लांब जाऊन आपल्या राज्यातील पदार्थ अतिशय आपुलकीने खाऊ घालणे आणि दिवसरात्र न थकता सेवा पुरवणे यामुळे स्पाईस एन आईस टीम ची लोकप्रियता वाढतच चालली आहे.
दांडिया खेळताना तरुणाईचा जल्लोष, उत्साह आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद यामुळे अभिव्यक्ती दांडियाची देशभरात आतुरतेने वाट पाहिली जाते.
गेल्या 6 वर्षांपासून स्पाईस एन आईसची टीम या कार्यक्रमात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते आणि अविरत सेवा पुरवते. स्वच्छता, चव आणि आकर्षक सजावट यामुळे दरवर्षी स्पाईस एन आईस ची टीम विविध कॅटेगरी मधील बक्षिसे मिळवते.
यावर्षी सुद्धा सर्व सहभागी कलाकार आणि आयोजक दैनिक भास्कर यांच्या कडून टीम स्पाईस एन आईस चं खूप कौतुक झालं. तसंच भोपाळ मध्ये दैनिक भास्कर चे एमडी श्री. सुधीर आग्रवाल व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती आग्रवाल यांच्या हस्ते स्पाईस एन आईस टीम ला बक्षीस मिळालं