सोलापूर तालुका पोलिस अलर्ट; हातभट्टया उद्ध्वस्त
Solapur Taluka Police Station Crime News
सोलापूर : विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणे अलर्ट झाले आहे.
अवैध गावंठी देशी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करण्यात आले. 1 लाख 19 हजार 800 लिटर गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. 257 हातभट्टी दारू, 620 प्लॅस्टिक व 30 लोखंडी बॅरेल नष्ट केले आहे. एकूण 52 लाख 73 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध जुगार खेळणा-या 29 इमसा विरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. 5 लाख 11 हजार 450 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. हातभट्टी दारू करीता लागणारे 40 पोते गुळ पावडर 30 कि.लो. पिकअप वाहनासह एकूण किंमत 5 लाख 10 हजार रूपये जप्त केले आहे.
- अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आगामी विधानसभा निवडणुक -2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन कोणताही अनुचित प्रकार होऊ या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील वडजी तांडा, सिताराम ताडा, मुळेगाव ताडा, पोचु ताडा, सेवालालनगर ताडा, ति-हे ताडा,गणपत ताडा व भानुदास ताडा,येथे दिनांक 20.10.2024 ते 06.11.2024 या कालावधीत चोरून अवैध गावंठी हातभट्टी दारूच्या हातभट्टयावर छापे टाकुन हातभट्टया उध्दवस्त केल्या आहेत.चोरून अवैधरित्या चालणा-या देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 52 लाख 73 हजार 500 रूपये किंमतीचे त्यामध्ये 1 लाख 800 लिटर गुळमिश्रीत रसायन, 620 प्लॅस्टीक व 30 लोखंडी बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तसेच अवैध गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य व अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. तसेच 257 हातभट्टी दारू लिटर हातभट्टी दारू व 05 रबरी टयुब नष्ट केले आहेत.तसेच अवैध हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारा 40 पोते गुळ पावडर एकूण 30 कि.लो पिकअप वाहनासह 5 लाख 46 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वरील ठिकाणी चोरून अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ व पोचु ताडा बक्षीहिप्परगा, वडाळा, बिबीदारफळ व ति-हे येथे अवैधरित्या हातभट्टी दारू बाळगणा-या विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल गुन्हयाच्या तपास पोनि/राहुल देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे.
मौजे बोरामणी व कोंडी येथे अवैधरित्या जुगार खेळणा-या एकूण 29 इसमा विरूध्द महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये 03 गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये एकूण 5 लाख 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुक -2024 ची प्रक्रिया शांततेत पार पाडुन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या करीता यापुढेही अशा प्रकारे चोरून अवैध हातभट्टीचा व इतर अवैध व्यवसाय करणा-या विरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची छापा कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर, परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अंजना क्रिष्णा व्ही.एस यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक,सोलापूर तालुका,पोलीस ठाणे, पोनि/कुंदन गावडे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोदविला आहे.