सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

चला मुंबई.. चला गोवा! 20 डिसेंबरपासून विमान उडणार

On: November 14, 2024 9:53 AM
Follow Us:
---Advertisement---

चला मुंबई.. चला गोवा! 20 डिसेंबरपासून विमान उडणार

सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा

सोलापूर विकास मंचाच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश

सोलापूर : सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित थेट विमानसेवा सुरू होणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली आहे.

ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.

मुंबईसाठी उड्डाण वेळापत्रक –

सोलापूर – मुंबई सकाळी ०९:४० वाजता विमान उडणार. स. १०:४० मुंबईत पोचणार

मुंबई – सोलापूर दुपारी १२:४५ वाजता विमान उडणार. दुपारी १:४५ सोलापुरात येणार.

गोवासाठी उड्डाण वेळापत्रक

सोलापूर – गोवा
दुपारी ०२:१५ वाजता
दु. ०३:१५ गोवा पोचणार

गोवा – सोलापूर सकाळी ०८:१० वाजता
स. ०९:१० सोलापुरात पोचणार

सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी

सोलापूर विकास मंचाच्या नेतृत्वात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. या सेवेमुळे पर्यटन, उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे, असे मत विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now