गुन्हे वृत्त

19 तोळे सोने, अपहरणाचा बनाव अन् मृतदेहाचे तुकडे!

सोलापूर : 19 तोळे सोने लुटण्यासाठी अपहरणाचा बनाव करून शेतमालकाचा खून केला. मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी सालगडी म्हणून काम करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक १५.१२.२०२४ रोजी कृष्णा नारायण चामे वय ५२ वर्षे सध्या रा. यल्लमवाडी ता. मोहोळ हा मिसींग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. मिसींगच्या ०३ दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसींग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसेच मिसींग व्यक्तीची सर्व जिल्हयातील तसेच आसपासच्या जिल्हयातील पोलीस ठाणेस तपास यादी पाठवून मिसींग व्यक्तीचे मोबाईलचा सीडीआर काढुन त्याचे अवलोकन केले पंरतु सदर मिसींग व्यक्ती बाबत काही एक माहीती मिळून आली नाही.

सदर मिसींग मध्ये दिनांक १७.१२.२०२४ रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन नमुद मिसींग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सदरच्या अपहरणाचे तपासात अपहृत व्यक्तीचे शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांचे कडुन माहीती मिळाली की, सदर अपहृत इसमास एका अज्ञात व्यक्तीने मोटार सायकलीवर घेवून गेल्याची माहीती मिळाली. सदर प्रकरणातील कृष्णा चामे याचे घर हे शेतामध्ये फॉरेस्ट ला लागुन आहे. सदर घराच्या आसपास साधारणता ०५ ते ०६ किलो मिटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्टची जमीन आहे. त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रीक मदत मिळत नव्हती. तरी देखील घटनेच्या ०५ ते ०६ किलो मिटर क्षेत्राचे बाहेरील रोडवर जावुन सीसीटीव्ही चेक करण्यात आलेली होती. पंरतु उपयुक्त माहीती मिळत नव्हती. अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता. त्याचा सीडीआर काढुन सर्व संशयीत व्यक्तीचा अभ्यास केला असता गुन्हयाचे तपास उपयुक्त माहीती मिळुन येत नव्हती.

अपहृत इसम नामे कृष्णा चामे व त्याचे कुटूंबीयांचे बॅक स्टेटमेंन्ट व इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहार चा अभ्यास केला असता अप-हत व्यक्तीचे आसपासच्या १० ते १२ गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसुन आल्याने त्या सर्व लोकांकडे सदर बाबत तपास केला पंरतु त्यातुन ही गुन्हयाचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही. कृष्णा चामे यांचा फोटो प्रसारमाध्यमाव्दारे प्रसारीत करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, हॉटेल, या ठिकाणी अपहृत व्यक्तीचे फोटो प्रसिध्द केले. तसेच घटनेच्या ठिकाणचे आसपासचे सर्व नदी, नाले, विहीरी, कॅनाल व फॉरेस्ट असे आसपासचे सर्व ठिकाणी शोध घेतला असता अपहृत व्यक्ती मिळून आला नाही.

अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहरण व्यक्तीचा तपास करून देखील काहीही भरीव माहीती मिळाली नाही. मात्र अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणुन राहणारा सचिन भागवत गिरी वय २५ वर्षे ता. सांगवी जि. धाराशिव यांचे चौकशीत विसंगती समोर येत होती. तेंव्हा सचिन गिरी यास संशयीत म्हणुन ताब्यात घेवून त्याचे कडे गुन्हयाचे अनुशंगाने सखोल चौकशी केली असता, सदरचा गुन्हा हा त्यांने स्वतः केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा हा त्यांने आर्थिक कारणाने व सोन्याचे लोभासाठी केल्याचे सांगितले आहे. तसेच सदर कृष्णा चामे यास त्यांने डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम ठार मारले. व त्यानंतर त्यांने धारधार हत्यारांने त्याचे शरीरांचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळया पॉलीकॅप कॅरीबॅग मध्ये भरून मयताचे शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवले होते. तसेच मयताचे अंगावरील सुमारे १८ ते १९ तोळे सोने, लॉकेट, अंगठया व सोन्याचे कडे असे त्यांने मयताचे घरासमोरील खड्डयात पुरले असल्याचे सांगितले. तसेच सदरची हत्या त्यांने एकट्यानेच केली असल्याचे सध्या तो सांगत आहे. तरी पंरतु गुन्हयाचे तपासात अधिक तपास करून आणखीन सह आरोपी आहेत अगर कसे याबाबत तपास करीत आहे. सदर आरोपी नामे सचिन भागवत गिरी वय २५ वर्षे रा. सांगवी जि. धाराशिव यास गुन्हयाचे तपासात अटक करून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक श्री. रणजीत माने मोहोळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदर अटक आरोपी सचिन भागवत गिरी याचे विरूध्द धाराशिव जिल्हयातील अंबी पोलीस ठाणे येथे यापुर्वी ०३ चोरीविषयक गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आलेला आहे.

सदरची उल्लखनीय कामगिरी ही अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा.विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग, मा. संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक श्री. रणजित माने मोहोळ पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरिक्षक श्री. किरण पाटील, पोलीस उपनिरिक्षक श्री. गजानन कर्णेवाड, श्री. अजय केसरकर, डी. बी. पथकातील पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, पोहेकॉ / संदेश पवार, पोना/चंद्रकांत ढवळे, पोकों/अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड, पोलीस ठाणे कडील पोहेकॉ/समाधान पाटील, संतोष चव्हाण, पोकॉ/ धनाजी घोरपडे, कैलास डाखोरे, चापोकॉ/ श्रीशैल्य शिवणे, हरी आदलिंगे, अनिल वाघमारे व डी. वाय. एस.पी. कार्यालयाकडील श्री. प्रदिप झालटे सहा. पोलीस निरिक्षक, पोहेका / शरद डावरे, अशपाक शेख, पोकों/देवा सोनवलकर यांनी बजावली आहे.

Related Articles

Back to top button