सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

रविवारी सायंकाळी ‘गीत रामायण’चा भक्तीरसपूर्ण संगीत सोहळा

On: April 4, 2025 5:34 PM
Follow Us:
---Advertisement---

रविवारी सायंकाळी ‘गीत रामायण’चा भक्तीरसपूर्ण संगीत सोहळ

सोलापूर : श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने स्पाईस एन आईस आयोजित, चितळे एक्स्प्रेस प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स व इंद्रधनु प्रायोजित‌भव्य ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा भक्तिरसाने परिपूर्ण संगीतमय सोहळा रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पार पडणार आहे.

 

गीत रामायण’ – मराठी संगीत विश्वातील एक अजरामर कलाकृती ‘गीत रामायण’ ही मराठीतील एक अजरामर संगीत रचना आहे. प्रसिद्ध गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी सुरेल आवाजात सादर केलेली ही अप्रतिम काव्यरचना आजही लाखो रसिकांच्या हृदयात विशेष स्थान राखून आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनप्रवासावर आधारित या गीतांनी संगीतप्रेमींच्या मनात ठसा उमटवला आहे.

सोलापूरकरांसाठी सुवर्णसंधी

या भव्य संगीत कार्यक्रमात प्रख्यात गायक श्री. अमित नेसरीकर आणि मुंबईतील सुप्रसिद्ध कलाकार‌आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्या सोबत –
🎤 गायन: श्री. अमित नेसरीकर
🎙 निवेदन: श्री. समीर नेसरीकर
🥁 तबला: श्री. मंदार पुराणिक
🎻 व्हायोलिन: श्री. राजन माशेलकर
🎹 हार्मोनियम: श्री. अनिरुद्ध गोसावी
🪘 तालवाद्य: श्री. नंदकुमार रानडे

सोलापूरकरांना या मधुर आणि भक्तिरसपूर्ण गीतांच्या प्रवाहात रंगून जाण्याची संधी मिळणार आहे.
प्रवेश मोफत असून, प्रवेशिका आवश्यक आहे.

प्रवेशिका कुठे मिळतील?
मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध आहेत:
📍 *स्पाईस एन आईस इव्हेंट्स ऑफिस* – युनिटी श्रद्धा आर्केड बिल्डिंग, जुळे सोलापूर
📍 *चितळे एक्सप्रेस* – डफरीन चौक, दमाणी रक्तपेढीसमोर, सोलापूर
📍 *अनादि केटरर्स* – स्टेशन रोड, सोलापूर
📍 *अनादि केटरर्स ब्रॅंच 2* – सुशील नगर, डी मार्ट रोड, जुळे सोलापूर
📍 *इंद्रधनु ऑफिस* – विष्णू मिल कंपाऊंड, मंगळवेढा रोड, सोलापूर
📍 *पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स* – ध्रुव हॉटेल समोर, रेल्वे लाईन्स, सोलापूर

अधिक माहितीसाठी संपर्क:
📞 9607165091
टीम स्पाईस एन आईस

रसिक श्रोत्यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now