सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

विष्णू मोंढे यांना अमेरिकेच्या बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट!

On: April 22, 2025 1:14 PM
Follow Us:
---Advertisement---

Vishnu Mondhe receives Doctorate from Burlington State University News

सोलापूर : सोलापुरातील उद्योजक, मोंढे मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर विष्णू संतोषराव मोंढे यांना अमेरिकेतील बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.

विष्णू मोंढे यांनी आपले प्राथमिक शिक्षण नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मोहदी येथे पूर्ण केले. तर १२ वी पर्यंतचे शिक्षण नरखेड येथे करून त्यांनी आपले ऑटोमोबाईल इंजिनीरिंग हे चेन्नईला कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथून पूर्ण केले.
सुरवातीला प्रीमियर पद्मिनी, एस्कॉर्ट ट्रॅक्टर, एल एम ल येथे सर्विस इंजिनियर म्हणून काम केले, आणि नंतर स्वतःचा व्यवसायाला १९९२ साली सुरवात करून एल एम ल ची व रॉयल एनफिल्ड ची डिलरशिप सुरु केली. एल एम ल व रॉयल एनफिल्ड चे अनेक पुरस्काराने सन्मानित झाले तर २००१ साली त्यांची रॉयल एनफिल्ड च्या सल्लागार समितीवर सुद्धा नेमणूक केली होती. भारतातील सर्वात पहिल्यांदा २००६ साली इलेक्ट्रिक स्कुटर यो बाईक सोलापूरमध्ये आणून मोठ्या संख्येने विक्री करून एक उच्चांक प्रस्थापित केला. आज त्यांच्याकडे रॉयल एनफिल्ड, डिजिटल सेक्युरिटी, महिंद्रा अँड महिंद्रा ट्रक्स आणि बसेसची सोलापूर, लातूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथे त्यांच्या ऑटोमोबाइल्स च्या शाखा असून त्या ते समर्थपणे चालवीत आहेत. तर पंढरपूर येथे हॉटेल व्यवसायात ही पदार्पण केले आहे.

मूळचे नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विष्णू मोंढे हे पांच भाऊ व तीन बहिणी असून सर्व उच्च शिक्षित आहेत, तर आई वडिलांकडून आलेला सामाजिक कार्याचा वसा त्यांनी पुढे चालू ठेवत सोलापूर रेल्वे स्टेशन सल्लगारपदी आठ वर्षे कार्य केले आहे. विष्णू मोंढे हे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी प्रांतपाल आहे त्यांनी रोटरीच्या अनेक पदावर उत्तम कार्य केले त्यांचा रोटरीच्या प्रांतपाल पदाचा कार्यकाळ रोटरी विश्वात चांगलाच नावलौकिकेला आला. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्याद्वारे रोटरी गाव खेड्यापर्यंत पोहोचवून समाजहिताचे कार्य घडवून आणले.

लहान मुलांचे हृदयाचे मोफत ऑपेरेशन, पूरग्रस्त करीता केरळ येथील कोची येथे मोफत घरे बांधून दिली. पोलिओ निर्मूलन करण्याकरिता त्यांनी रोटेरियन्स च्या अनेक रॅली काढून जण जागृती करून भारतातंतून पोलिओ हद्दपार करण्यास मोलाचा सहभाग नोंदविला. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे रोटरी डायलेसिस सेंटर त्यांचे कार्यकाळातच सुरु केले आहे‌. ते उधमपूर, उदगीर तर युगांडा येथेही मेडिकल मिशन मध्ये सहभागी होऊन व्हॉलेंटियर म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले आहे. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतानाच स्कॉटलंड ची नामांकित हैचं फ्री मेसॉनिक चे सुद्धा माजी अध्यक्ष असून त्याही मार्फत त्यांनी त्यांचे कार्यकाळात सावळेश्वर ग्राम पंचायत स्मशान भूमीची गरज बघून त्या स्मशान भूमीला लोखण्डी दाहिनी भेट देऊन तेथील गरज भागविण्याचा प्रयत्न केला तेथील ग्रामस्थांची स्मशान भूमीची पावसाळ्यात होणारी गैरसोय आणि इंथनाचा असलेला तुटवडा या दाहिनी मुळ कमी केला. थंडीचे दिवसात गरजूंची गरज ओळखून माणुसकीची भिंत हि त्यांनी अनेक वेळा जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि रंगभवन येथे लावून सामाजिक कार्य केले. या सोबतच त्यांनी आपल्या व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही तर शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला या सर्व बाबीची दखल घेऊन बर्लिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी ने दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी त्यांना गुलमोहर, इंडिया हॅबिटॅट सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे “बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि सोशल वर्क्स” या विषयात सुवर्ण पदकासह डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. या सामाजिक कार्यात त्यांना त्यांचे सर्व कुटुंबीय नेहमी साथ देतात तर बंधू पवन यांचेही व्यवसायात मोलाचे सहकार्य असते.

विष्णू मोंढे यांच्या या यशाबद्दल नातेवाईक आणि मित्र परिवारातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now