सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

ठरलं! fly91ची सोलापूर-गोवा विमानसेवा!

On: May 27, 2025 3:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Solapur Goa fly91 Flight Service

गोवा-सोलापूर मार्गासाठी बुकिंग आता सुरू झाले

सोलापूर / पणजी : गोवा येथील प्रादेशिक विमान सेवा पुरवणाऱ्या फ्लाय९१ने गोवा ते सोलापूर दरम्यान थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या मार्गामुळे फ्लाय९१ भारतातील एकूण आठ शहरांपर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध करून देणार असून, यात महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि आता सोलापूर यांचा समावेश आहे.
गोवा-सोलापूर दरम्यानची ही थेट विमानसेवा प्रवाशांसाठी प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुलभ करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोवा-सोलापूर मार्गासाठी बुकिंग आता सुरू झाले असून, तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

फ्लाय९१ एक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत आहे, यामुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला आणि सोलापूरच्या धार्मिक व औद्योगिक वैशिष्ट्यांना दोन्ही भागांतील प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि सहज करता आले आहे.

सोलापूर हे नैऋत्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, ते आपल्या समृद्ध कापड उद्योगासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ओळखले जाते. याचबरोबर, सोलापूर हे धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण ते पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), तुळजापूर(तुळजा भवानी मंदिर), अक्कलकोट (स्वामी समर्थ महाराज मंदिर),गंगापूर (श्री नरसिंह सरस्वती स्वामी मठ) आणि भीमाशंकर या पाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे सोलापूर हे औद्योगिक आणि धार्मिक वारशाचा संगम असलेले शहर आहे.

पहा आमदार देवेंद्र कोठे काय म्हणाले..

“गोवा-सोलापूर मार्गाची सुरुवात ही पारंपारिकपणे कमी सेवा असलेल्या भागांमधील हवाई संपर्क सुधारण्यावर फ्लाय९१चा लक्ष केंद्रित असल्याचे अधोरेखित करते,” असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले. “सोलापूर हे केवळ एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र सर्किटमधील एक प्रमुख धार्मिक केंद्र देखील आहे. आमच्या विमानसेवेमुळे यात्रेकरूंना तसेच व्यवसाय आणि आरामदायी प्रवास करणाऱ्यांना या प्रदेशात सहज आणि सुरक्षित प्रवास करता येईल,” असे ते पुढे म्हणाले.

सोलापूरमध्ये विस्तार करताना आम्हाला अमूल्य पाठिंबा देणाऱ्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, नागरी विमान वाहतूक महासंचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर सर्व भागधारकांचे फ्लाय९१ने आभार मानले आहे.

सोलापूर विकास मंचच्या संघर्षाला यश

ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे! Fly 91 या विमान सेवेद्वारे सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या मार्गावरील तिकिट बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक क्षणामागे सोलापूर विकास मंच व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा अनेक वर्षांचा सातत्यपूर्ण संघर्ष, पाठपुरावा आणि अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. सोलापूरसारख्या शहरातून गोवा या महत्त्वाच्या पर्यटन व औद्योगिक शहराशी थेट हवाई संपर्क होणे ही एक ऐतिहासिक आणि विकासात्मक घटना आहे.

सोलापूर विकास मंचने केंद्र सरकार, नागरी उड्डाण मंत्रालय व DGCA यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर सोलापूरकरांच्या स्वप्नाला वास्तवात आणले. सर्व सोलापूरकरांना आवाहन करण्यात येत आहे की, तात्काळ आपल्या तिकिटांची नोंदणी करून या ऐतिहासिक उड्डाणाचा लाभ घ्यावा!

ही केवळ एक सेवा नाही, तर सोलापूरच्या विकासाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे. बुकिंगसाठी Fly 91 च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपल्या प्रवासाची तयारी करा!

– विजय जाधव, सदस्य, सोलापूर विकास मंच

खालील इमेजवर क्लिक करून तिकीट बुक करता येईल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now