यकृत प्रत्यारोपणामुळे सोलापूरच्या रुग्णाला नवजीवन

यकृत प्रत्यारोपणामुळे सोलापूरच्या रुग्णाला नवजीवन

Apollo Hospital Ashok Jadhav Liver Transplant News

सोलापूर : नवी मुंबईतील अत्यंत आधुनिक मल्टि-स्पेशालिटी क्वार्टनरी इस्पितळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्स येथे 31 जानेवारी 2023 रोजी जीवित दात्याच्या यकृताचे सोलापूर येथील रूग्णावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली.

महाराष्ट्राच्या जलसिंचन विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंते असलेल्या 62 वर्षे वयाच्या अशोक जाधव यांना विघटित यकृताचा सिरॉसिस आणि हेपॅटो रेनल सिंड्रोमचा आणि त्यासोबत हायपरटेंशन, डायबेटिस मेलिटस आणि इस्केमिक हृदयरोगासारखे इतर अनेक त्रास होता. त्यांना यकृत प्रत्यारोपणासाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

हे प्रत्यारोपण अपोलो यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. डॅरियस मिर्झा यांसोबत एचपीबी सल्लागारांचा संघ व डॉ. शैलेश साबळे, डॉ. रोहन चौधरी, डॉ. केतुल शाह आणि ज्येष्ठ हिपॅटोलॉजिस्ट डॉ. आभा नागराल व अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉ. कल्पना ताठे व डॉ. पिंकी कृपलानी यांद्वारे करण्यात आले.  रुग्णाचे चिरंजीव, पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठातील इम्युनोलॉजीचे प्राध्यापक संपतकुमार जाधव यांनी त्यांच्या यकृताचा 60% भाग दान करून त्यांच्या वडिलांना जीवदान दिले. त्यांची तब्येत कोणत्याही समस्येविना बरी झाली आणि दोघांनाही शस्त्रक्रियेनंतरच्या 1 ल्या आणि 2 ऱ्या आठवड्यामध्ये घरी जाऊ दिले. 

अतिदक्षता विभाग सल्लागार, अतिदक्षता शुषृषा विभागातील फिजीशियन आणि सोलापूरच्या आधार हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. योगेश राठोड म्हणाले, “श्री. जाधव हे गेले चार वर्षे हायपरटेंशन, डायबेटिस व हृदयरोग ज्यासाठी 2019 मध्ये त्यांच्यावर 2 स्टेंट्सची अँजिओप्लास्टी झाली होती अशा विविध वैद्यकीय समस्यांसाठी माझ्याकडून उपचार घेत होते. त्यांना त्यांच्या परिस्थिती बिघडत जाणाऱ्या यकृताच्या विकारावर बऱ्याचदा बोलवण्यात आले होते, आणि त्यावर इलाज करण्यासाठी नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्समधील प्रत्यारोपण तज्ञांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचा मला आनंद वाटत आहे आणि श्री. जाधवांना आता जगण्याची नवी संधीच मिळाली आहे.” आधार हॉस्पिटल येथील हिपॅटोलॉजिस्ट व गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट असलेले डॉ. गुरूप्रसाद पडसळगी हे देखील आपल्या रूग्णाच्या उपचारामध्ये सक्रियरीत्या सहभागी होते.  अपोलो हॉस्पिटल्स पश्चिम क्षेत्राचे यकृत आणि एचपीबी कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार प्रा. डॅरियस मिर्झा म्हणाले, “श्री. अशोक यांना विघटित यकृत सिरॉसिस त्याचबरोबर हिपॅटो-रिनल संड्रोमचे निदान झाले होते. त्यांना याआधी मूत्रपिंडातील बिघाड आणि मेंदूकार्यातील बिघाडाची व रक्तातील क्रिएटिनिनच्या पातळ्यांमध्ये वाढ या विकारांची पार्श्वभूमी होती. संपूर्ण मूल्यमापन आणि हृदयरोग तज्ञांशी, हिपॅटोलॉजिस्ट व मूत्रपिंडविकार तज्ञांशी विविध प्रकारे चर्चा करून आम्ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. या शस्त्रक्रियेला यश आल्याने आमच्या वैद्यकशास्त्रातील तज्ञांचे कौशल्य व समर्पणभावाचा गौरव करणे योग्य ठरते. आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्राला 5000 पेक्षा अधिक प्रौढ आणि बाल यकृत प्रत्यारोपणातील गाढा अनुभव आनंदाने समर्पित करतो. आमच्या रूग्णांवरील शस्त्रक्रियेचा यशाचा दर प्रौढांमधील 95% आणि लहान मुलांमध्ये 97% असून यामध्ये दात्यांना संपूर्ण सुरक्षा दिली जाते.”  नवी मुंबईचे अपोलो हॉस्पिटलचे एचपीबी सलागार आणि यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. रोहन चौधरी म्हणाले, “मागील 3 वर्षांमध्ये जाधवांच्या यकृत बिघाडामध्ये खूपच वाढ झाली होती आणि यकृत प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये ज्यांना यकृत मिळणार त्यांचे नुकसान झालेले संपूर्ण यकृत काढले जाते आणि त्याजागी दात्याच्या यकृताचा भाग लावला जातो. खूपच वाढलेल्या यकृताच्या विकारामुळे, शारिरीक कमजोरी, कमी काळ चालू शकेल असे यकृताचे कार्यचलन, हृदयाचे कमजोर कार्यचलन आणि त्यासोबत असलेल्या इतर बऱ्याच विकारांमुळे श्री. जाधवांची शस्त्रक्रिया खूप क्लिष्ट होती. शस्त्रक्रिया 10 तास चालली. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दाता आणि प्राप्तकर्त्यांमधील यकृताचे अर्ध्यावरून संपूर्ण रूप घेण्यास प्रत्यारोपणापासून 2 महिने लागतात. प्राप्तकर्त्यांना ग्राफ्टला नुकसान न होण्यासाठी आयुष्यभर इम्युनोसप्रेशन औषधे देणे सुरू केले गेले. यामुळे प्राप्तकर्त्यांना संसर्ग होण्याचे टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी लागेल. औषधे वेळेवर घेणे आणि नियमित रक्तचाचण्या करण्यासारख्या काही प्रतिबंधाना वगळता प्रत्यारोपणानंतरचे आयुष्य पूर्णपणे साधारण असते.”  अपोलो हॉस्पिटल्स पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय सीईओ असलेले श्री. संतोष मराठे म्हणाले, “श्री. अशोक जाधवांना एक नवे जीवनदान दिल्याचा आम्हाला आनंद आहे. हे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सकडे सोलापूरमधून सुचवण्यात आलेले पहिले आहेत आणि यामध्ये आलेले यश हे आमच्या यकृत प्रत्यारोपण संघाच्या कौशल्य आणि अनुभवाला मिळालेली पोचपावती आहे.  यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमाचे आमचे प्रमुख डॉ. डॅरियस मिर्झा यांना क्लिष्ट एचपीबी शस्त्रक्रियांचा 35 वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव आहे आणि त्यांना ब्रिटीश ट्रांसप्लांटेशन सोसायटी कडून मानाचा लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला आहे.  हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सूक्ष्म तपासणीनंतर रूग्ण सोलापूरला निरोगी आणि आनंदाने परतला आहे. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामुळे महाराष्ट्रातील यकृत विकारांनी त्रस्त रूग्णांना आशेचा नवा किरण दिसतो आणि हॉस्पिटलची आपल्या रूग्णांना जागतिक दर्जाची वैद्यकीय शुषृषा पुरवण्याची वचनबद्धता स्पष्ट करते.”  श्री. अशोक जाधव यांनी वैद्यकीय संघाचे आभार मानले आणि म्हणाले, “माझ्या अपोलो हॉस्पिटल्समधील वास्तव्यादरम्यान डॉक्टर्स आणि नर्सेसच्या संघाने माझी काळजी घेतल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मला आपल्या यकृताचा भाग दिलेल्या माझ्या मुलाचाही मी ऋणी आहे ज्यामुळे मी आता माझे नवे आयुष्य जगतो आहे. मी समाजकल्याणासाठी, यकृत रोगांबद्दल आणि अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करू इच्छितो. मी लवकरच सोलापूरच्या माझ्या शेतात काम करायला सुरू करू इच्छितो.” दाते असलेले श्री. संपतकुमार म्हणाले, “डॉक्टरांनी मला यकृतदानाबद्दल असलेल्या सर्व शंका आणि अस्वस्थतेतून मोकळे केले आणि या चमत्कारिक शस्त्रक्रियेला आम्ही सामोरे गेलो. इतक्या दीर्घकाळाच्या आजारानंतर एक सामान्य आयुष्य जगत असलेल्या माझ्या वडिलांकडे पाहून मला प्रचंड गर्व आणि आनंद वाटतो आहे.”  नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सबद्दल: जेसीआय मान्यताप्राप्त असलेले नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे मुंबई आणि नवी मुंबईतील सर्वात प्रगत बहु-वैशिष्ट्ये असलेले वैद्यकीय उपचार पुरवणाऱ्या रुग्णालयांपैकी एक आहे.

हे रुग्णालय एका छताखाली सर्वसमावेशक आणि एकात्मिक उत्कृष्ट वैशिष्ट्य असलेली सेवा प्रदान करते, ज्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे उच्च अनुभवी डॉक्टर तसेच परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांचा देखील समावेश आहे.  अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा : अर्चिशा गुप्ता: 7734894373: archisha.gupta@adfactorspr.com आमीर सय्यद: 9833389578: aamir.sayed@adfactorspr.com सरिता लॉरेन्स: 7208066222: sarita_l@apollohospitals.com