‘भगवा आखाडा’च्या अहिल्यारत्न पुरस्कारांचे वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती 51 मुर्तीचे वाटप
सोलापूर : भगवा आखाडा युवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त अहिल्यारत्न पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सुशील रसिक सभागृह येथे उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात मंडळांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती 51 मुर्तींचे वाटप करण्यात आले.
भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुरज बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर, औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, सोलापूरचे आमदार, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी महापौर महेश कोठे, युवा नेते देवेंद्र कोठे, अजिंक्यराणा पाटील, भाजपाचे प्रदेश सदस्य नरेंद्र काळे, श्रीकांत घाडगे, राज सलगर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपण समाजाचे काही देणे लागतो या संकल्पनेतून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती 51 मुर्तीचे वाटप सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध 51 उत्सव मंडळांना करण्यात आले. धनगर समाजात विशेष कार्य करणार्या गोविंद काळे (लेखक, कवी) उज्वलकुमार माने (समाजबोधन), समाधान वाघमोडे (पत्रकारीता), आंतरराष्ट्रीय जलतरणपटु ईशा वाघमोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते अहिल्यारत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
Gopichand Padalkar Speech -
याप्रसंगी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनसमुदायाला संबोधित केले. इतरही मान्यवरांनी आपले संवाद साधला. भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानचे रवी कोटमाळे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानचे संकेत बंडगर, सुरज मोरे, प्रसाद पवार, सुरज बावधनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.