#MarriageAnniversary अमोल कोल्हे यांनी सांगितला आनंदी संसाराचा राज!

#MarriageAnniversary अमोल कोल्हे यांनी सांगितला आनंदी संसाराचा राज!

Dr-Amol-Kolhe-Marriage-Anniversary

सोलापूर : अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी सहचारिणी अश्विनी कोल्हे यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या भावना व्यक्त करून आनंदी संसाराचा राज त्यांनी सांगितला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या सौभाग्यवती डॉ. अश्विनी कोल्हे या मुंबई येथील केईएम रुग्णालयात २००९ पासून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

खासदार अमोल कोल्हे यांची पोस्ट - 

‘१४ वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही पण १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे.. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना..दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत... ताटकळत...१) "तू चूक" आणि २) "मीच बरोबर"....कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो.. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!’