चला नागराज, आकाश अन् सायलीला भेटूया!

चला नागराज, आकाश अन् सायलीला भेटूया!

सोलापूर : बहुप्रतिक्षित घर बंदूक बिरयानी चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे आणि चित्रपटातील इतर कलावंत उद्या सोमवार दि. 27 मार्च रोजी सोलापुरात येत आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, युवा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील यांचा दमदार अभिनय असलेल्या घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाकारांसोबतच झी स्टुडिओची संपूर्ण टीम उपस्थित असणार आहे.

असे आहे नियोजन -  
दि. 27 मार्च 2023  
सकाळी 9 वाजता : 
दयानंद कॉलेज 

सकाळी 10 ते 10.45 : प्रेरणा भूमी, छत्रपती शिवाजी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

सकाळी  11 वाजता : 
व्ही. व्ही.पी. कॉलेज

दुपारी 1 वाजता : 
मयूर क्लासिक ए सी बँक्वेट हॉल 
दुपारी 2 वाजता : 
प्रेस कॉन्फरन्स, मयूर क्लासिक ए सी बँक्वेट हॉल येथे  

दुपारी 4  वाजता: सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेज