‘कामतकर क्लासेस’तर्फे गुणवंतांचा सत्कार

‘कामतकर क्लासेस’तर्फे गुणवंतांचा सत्कार

Kamatkar Classes Sunil Kamatkar Sukhada Kamatkar News

सोलापूर : आपली मुले मोबाईलच्या माध्यमातून नेमकं काय पाहत आहेत याकडं पालकांनी लक्ष द्यावे. विद्यार्थी दशेमध्ये सोशल मीडियापासून दूर राहणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रा. विशाल गरड यांनी केले.

कामतकर क्लासेसच्या सन 2022-2023 वर्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. गरड बोलत होते.

श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री (पोलीस उपअधीक्षक, सोलापूर ग्रामीण) आणि प्रा. विशाल गरड (बार्शी) यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मंचावर कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर, सुखदा कामतकर, श्री. कदम सर उपस्थित होते.

प्रा. विशाल गरड म्हणाले, ‘तुम्ही कसे दिसता याला महत्त्व नाही, तुम्ही कसे आहात याला महत्त्व आहे. कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या करणे हा पर्याय नाही. कमी मार्क मिळवलेले अनेकजण मोठे झाले आहेत. कमी मार्क मिळाले म्हणून खचून जाऊ नका. विद्यार्थांनी सोशल मीडियापासून दूर रहावे.’

पोलीस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कूरी यांनीही विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी कामतकर क्लासेस शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर्षदा क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.