सिना-भीमा खोऱ्यात मंद्रुप पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी

Mandrup Police Station Ravindra Manjare News
सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण 25 पोलीस स्टेशन आहेत. जिल्ह्यातील सर्वांगीण कामकाजामध्ये सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून मंद्रुप पोलीस स्टेशनने दुसरा पटकावला पटकावला आहे.
जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा पहिल्या क्रमांकाचा मान पंढरपूर शहर पोलीस ठाण्याला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन निवडताना विविध मुद्द्यांचा विचार केला जातो. शासनाने घालून दिलेल्या विविध निकषांमध्ये मंद्रूप पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे हे सध्या मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
1. महिलांविषयक गुन्हे कामकाज
2. दुर्बल घटकांविषयक गुन्हे कामकाज
3. मालचोरी विषयक कामकाज
4. मिसिंग व्यक्ती विषयक कामकाज
5. अनोळखी व्यक्ती ओळख पटविणे विषयक कामकाज
6. अनोळखी मृत व्यक्ती विषयक कामकाज
7. किरकोळ कायदे विषयक कामकाज
8. प्रतिबंधात्मक कारवाया विषयक कामकाज
9. समन्स वारंट बजावणी विषयक कामकाज
10. जुन्या गुन्ह्यांचा निपटारा करणे
11. गुन्हे शाबिती प्रमाण विषयक कामकाज
12. कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती हाताळणी विषयक कामकाज
13. पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी कामकाज
14. रस्ता सुरक्षा विषयक कामकाज
15. मुद्देमाल निर्गती
16. तपासावरील प्रकरणांची लवकरात लवकर निर्गती करणे
17. समाजातील सर्व घटकांसोबत मिटिंग करणे
18. पोलीस स्टेशन परिसरात पायाभूत सुविधा व सुलभ उपलब्धता
19. नागरिकांच्या व बाजारपेठेतील प्रतिक्रिया
20. बेकायदेशीर व्यवसायावरील कारवाया
आदी मुद्द्यांचा विचार करून जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मंद्रूप पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. या यशामुळे पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, अंमलदार यांचा आत्मविश्वास वाढला असून सिना-भीमा खोऱ्यातील नागरिकांची सेवा करत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- रवींद्र मांजरे
सहायक पोलीस निरीक्षक
मंद्रुप पोलीस स्टेशन