स्वस्तामध्ये मोबाईल घेणार का?

आंतरराज्यीय गुन्हेगाराकडून चोरीचे 14 गुन्हे उघड
सोलापुर शहर गुन्हे शाखेची कामगिरी
सोलापूर : शहरातील फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड, विजापूर नाका, सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी तसेच मार्केट आणि सोलापूर बसस्थानक येथे दागिने चोरी व मोबाईल फोन चोरीच्या घटना घडल्या होत्या.
त्याबाबत संबंधीत पोलीस ठाणेस चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. चोरीचे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाख, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार सपोनि / संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी चोरीचे गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट देवून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे, गुन्हे करण्याचे पध्दतीचा अभ्यास केला.
त्यासंदर्भाने, दि. १९/०९/२०२३ रोजी सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथक फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हिंदी भाषा बोलणारा एक इसम जुना पुना नाका येथील प्रभाकर महाराज मंदिरकडे जाणारे रोड जवळील बस पार्किंगच्या मोकळ्या मैदानात थांबला आहे. तो लोकांना स्वस्तात मोबाईल विकत पाहिजे आहेत काय? असे विचारत आहे. त्यामुळे त्या मिळालेल्या बातमीची स.पो.नि. संदीप पाटील यांनी खात्री केली.
त्यानंतर स.पो.नि. संदीप पाटील व त्यांचे पथकाने त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सापळा लावुन मोनुकुमार सतीश महतो (वय- १९ वर्षे, व्यवसाय - मजुरी, रा. बडी भगीयामारी, सकरीगली, सकरीगली रिवर ब्लाक, साहेबगंज, झारखंड, सध्या राहणार ताजबाग, नागपूर) यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडील लाल रंगाच्या पिशवीमध्ये सोन्याचे दागिने व एकुण 12 विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळून आले.
मिळून आलेल्या दागिन्यांबाबत व मोबाईल बाबत सुनिल दोरगे व.पो.नि. गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याने तपास केला. सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, व लातुर येथील भाजी मार्केट येथे जावुन गर्दीचा फायदा घेवुन लोकांची नजर चुकवुन शर्टच्या वरील खिशातील व पॅन्टच्या पाठीमागील खिशातील मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. तसेच सोलापूर शहरातील एस.टी. स्टॅन्ड व सराफा बाजार येथील महिलांचे दागिने चोरी केल्याचे कबूली दिली. मिळून आलेले दागिने व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. त्यानुसार, सोलापूर शहर, कोल्हापूर, लातूर व सांगली येथील खालील प्रमाणे चोरीचे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सपोनि संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने कौशल्याने तपास करुन, नमुद आरोपींकडून ३,६२,५००/- (तीन लाख बासष्ठ हजार पाचशे रुपये ) किंमतीचा ऐवज, त्यामध्ये २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १२ मोबाईल फोन, असा मुददेमाल हस्तगत करुन, सोलापूर शहरातील ०६, कोल्हापूर-०४, लातुर-०३ व सांगली-०१ असे एकुण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप- आयुक्त (गुन्हे / विशा), प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्या पाटील, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार, अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड, चालक - बाळासाहेब काळे यांनी केली आहे.