पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, राजेंद्र बहिरट यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या!

पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, राजेंद्र बहिरट यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या!

Police Officer Sunil Dorage Rajendra Bahirat News

सोलापूर : पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शहर पोलीस दलातील दोघा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

तत्कालीन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांची फौजदार चावडी पोलीस ठाणे येथून नियंत्रण कक्षात बदली केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र बहिरट यांच्याकडे आता आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्याकडे गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. नवीन पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सुनील दोरगे यांच्याकडे गुन्हे शाखेची पूर्ण वेळ जबाबदारी दिली आहे.