उद्या जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन; सकल मराठा समाजाचा निर्णय

Sakal Maratha Samaj Solapur Rasta Roko News
सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर सरकार पुरस्कृत अमानुषपणे केलेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्हापर प्रत्येक तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग रविवारी दिनांक ३ सप्टेंबर सकाळी दहा ते अकरा एक तास बंद करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्याचे ठरले आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून सरकारचा निषेध करावा. हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर, करमाळा, माढा, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, या ठिकाणी हम रस्त्यावर त्या त्या तालुक्यातील लोकांनी रस्ता रोको करून सरकारचा जाहीर निषेध करायचा आहे.
जालना येथे आंदोलन शांततेच्या मार्गाने मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जमलेल्या तमाम अबाल वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले, यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला हा हल्ला पूर्वतयारी करून पोलिसांनी घडवून आणला. कारण ग्रामस्थ शांततेच्या मार्गाने आंदोलन स्थळी बसले असताना. पोलीस कर्मचारी मात्र फौज फाटा घेऊन दंगली प्रमाणे हेल्मेट व संरक्षक जाळी घेऊन आंदोलन स्थळी जातात. याचाच अर्थ पोलिसांनी जाणून-बुजून हा हल्ला केला आहे. त्याचा जाहीर निषेध समाजाच्या वतीने होत आहे. तरी सर्व मराठा व मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवणाऱ्या तसेच सरकार विरोधी तमाम नागरिकांनी या रास्ता रोको मध्ये सामील होऊन सरकारचा निषेध करावा असे आवाहन सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.