नग्न फिरणार्‍या इरफानला मिळाला आधार!

नग्न फिरणार्‍या इरफानला मिळाला आधार!

Sambhav Foundation Solapur News

सोलापूर : गांधी नगर ते सात रस्ता, व्हि.आय.पी रोड, महावीर चौक, फॉरेस्ट भाजी मंडई, रेल्वे स्टेशन या परिसरात एक व्यक्ती पूर्णपणे नग्न अवस्थेत फिरायचा. आपल्यापैकी अनेकांनी त्याला पाहून रस्ता बदललेला असेल. नग्न अवस्थेत फिरणार्‍या या व्यक्तीचे पुनर्वसन करण्याचे काम सोलापुरातील संभव फाउंडेशनने केले आहे.

नग्न अवस्थेत फिरणारा हा व्यक्ती कधी रस्त्याच्या कडेला बसलेला असायचा तर कधी हातात काठी घेऊन उभा असायचा. मातीने काळपट पडलेलं शरीर.., केसांचा झालेल्या जटा आणि दाढीवर ओघळणारी माव्या सुपारीची लाळ.. असा तो किळसवाणा होता. भली मोठी शरीरयष्टी घेऊन स्वतः शीच बडबड करत फिरायचा.

सकाळच्या सत्रात गुरूनानक चौकापासून हेरिटेज, दारासा हॉस्पिटल, लष्कर भागातून सात रस्त्याच्या दिशेने तो रेल्वे स्टेशनकडे जात असे. पुन्हा दुपारच्या वेळी हाच पल्ला गाठायचा...! हा दिनक्रमच होता. पोटाची भूक भागविण्यासाठी तो मनोरुग्ण लोकांकडून हक्काने मागून खात होता. संभव फाउंडेशनचे संस्थापक अतिश सिरसट यांनी अनेक दिवसांपासून त्या मनोरुग्णासोबत राहून अनेक गोष्टी जवळून अनुभवल्या. 

छिनाल के पाणी ला...थॅमस्प ला...बिस्टॉल दे... मटन बिर्याणी चाहिए...गरम चहा... मावा, बिसलेरी...  या सार्‍या गोष्टी परिसरात असणार्‍या दुकानदारांकडून तो घ्यायचा. हातात काठी असल्याने आणि विद्रुप अवस्थेत असल्याने त्याला घाबरुन लोक वस्तू द्यायचे. या मनोरुग्णाचे नाव इरफान असून कुर्बान हुसेन नगर परिसरात त्याचे घर आहे. घरी त्याची वृध्द आई आहे. इरफानसोबत झालेल्या कौटूंबीक घटनेमुळे तो असा मनोरुग्ण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

संभव फाउंडेशनचे संस्थापक अतिश सिरसट यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त हरिष बैजल police commissioner harish baijal यांना मनोरुग्ण असलेल्या इरफान संदर्भात सविस्तर माहिती दिली. इरफानवर उपचार आणि पुनर्वसन होणे किती गरजेचे आहे. आणि तो पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला जळगावच्या मानवसेवा तिर्थला घेऊन जाण्यासाठी अतिश यांनी पोलीस आयुक्त बैजल यांच्याकडे मदत मागितली. इरफानला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याकडुन कागदपत्रांची पूर्तता करून जळगावला नेण्यात आले. यासाठी वाहनाची व्यवस्था पोलीस आयुक्त बैजल यांनी केली. 

इरफानवर उपचारासाठी मानवसेवा तिर्थच्या नरेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. तसेच सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनीही आस्थेने चौकशी करत जळगावला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर अ‍ॅण्ड पेशंट गॅलरीचे ब्रिजेश कासट यांनी प्रवासात खर्चासाठी पैसे दिले. याच पैशातून प्रवासात जेवण, पाणी, हँड ग्लोज, सॅनिटायझर घेण्यात आले.

साडेचारशे किलोमीटरच्या प्रवासात सोबत आकाश असल्याने थोडा आधार मिळाला. पोलीस शिपाई कुंभार साहेब आणि स्वामी साहेबांनी गाडी व्यवस्थित चालवली. मोटर विभागाचे रजपूत साहेब, एपीआय मोरे साहेब,पी.एस.आय गायकवाड साहेब, रॉकी, गौतम गवळी, दया गायकवाड यासह ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या सहकार्याने इरफानचे पुनर्वसन करण्यात आले आहे, असे संभव फाउंडेशनच्या अतिश यांनी सांगितले. 


पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्यासोबत अतिश

आम्ही संभव फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहरात अनेक वर्षांपासून मनोरुग्णांसाठी काम करत आहोत. आजपर्यंत सोलापूरमधून आणि आसपासच्या परिसरातून अनेक मनोरूग्णांचे पुनर्वसन केले आहेत. यात आपल्या सारख्या संवेदनशील दानशूर व्यक्तीमत्वांचे कळत नकळत हात जोडले गेले आहेत. संभव फाऊंडेशनला मनोरुग्णांसाठी रुग्णवाहिकेची खूप आवश्यकता आहे. रुग्णवाहिका घेण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे. आपली मदत खाली दिलेल्या संभव फाऊंडेशनच्या बँक खात्यात जमा करू शकता.
- आतिश कविता लक्ष्मण, 
संभव फाऊंडेशन, सोलापूर 
9765065098

Account Title:- SAMBHAV FOUNDATION,SOLAPUR
Bank Name:- BANK OF INDIA
Branch Name: -SUBHASH CHOWK Solapur
Account No: - 070110110020789
IFSC Code:-BKID0000701
MICR Code:-413013003