सर्वोत्तम तरुण मंडळाचा सर्वोत्तम निर्णय

सर्वोत्तम तरुण मंडळाचा सर्वोत्तम निर्णय

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी वृक्षारोपणाचा निर्णय

सोलापूर : भवानी पेठमधील सर्वोत्तम तरुण मंडळाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. तरुण मंडळाच्या वतीने कल्पनेतून वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून मंडळाने विविध प्रकारच्या 50 झाडांचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन सुद्धा करण्याचे मंडळाच्या तरुणांनी ठरविले आहे. 

या मंडळाच्या माध्यमातून दररोज विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या मंडळाचे अध्यक्ष चेतन विजापुरे असून उपाध्यक्ष अक्षय बिद्री आहेत.

या वृक्षारोपणासाठी यश डेव्हलपर्स मालक सुयश खानापुरे, सोनाली खानापुरे, नमिता पोरवाल, किरण भुतडा, अश्विनी बिरोळी, अश्विनी करवा, चेतन विजापुरे, निखिल करवा , शिवानंद खोबरे, सिद्धांत भुतडा, श्रेयस भुतडा, विनय कामशेट्टी, सौरभ आलुरे, सदानंद खोबरे, रोशन भुतडा, दर्शन भुतडा, भुषण भुतडा, जमनादास भुतडा या सर्वांनी प्रयत्न केले.