चोरटा 24 तासात जेरबंद; 5 लाख 56 हजार जप्त

चोरटा 24 तासात जेरबंद; 5 लाख 56 हजार जप्त

Solapur Foujdar Chawadi Police Station Crime News

सोलापूर : घरातील रोख ५,६०,०००/-रू रक्कमेची चोरी करणाऱ्या आरोपीस चोवीस तासाच्या आतमध्ये मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

मोहसिन आयुब शेख (वय २५ वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी, मुळ राहणार- मु.पो.लोहारा, ता. लोहारा, जिल्हा-उस्मानाबाद. सध्या राहणार- पुजा सुधाकर गंजे याच्याघरी भाड्याने आवंती नगर, मुरारजी पेठ, सोलापूर) हे दि. २५/०९/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. ते ०९.३५ वा. चे दरम्यान आपल्या घराचा दरवाजा उघडुन घराची साफसफाई करत होते. पैशाचा बॉक्स उचलुन खुर्चीवर ठेवुन रूमचा दरवाजा पुढे करून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. चोरट्याने शेख यांची रक्कम चोरून नेली. 

दि.२५/०९/२०२३ रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फौजदार चावडी पोलिसांनी तपासला सुरुवात केली.

पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली की, जुना पूना नाका येथील समर्थ लॉज येथे अफताब सत्तार अत्तार हा चोरीची रोख रक्कम घेवुन थांबला आहे. 

गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस स्टाफ व पंच असे समर्थ लॉज येथे गेले. तेथील रजिष्टर तपासले. अफताब सत्तार अत्तार रूम नंबर - ११० मध्ये होता. पोलिसांना पाहुन तो पळु लागला. त्यावेळी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव अफताब सत्तार अत्तार (वय २३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. प्लॉट नंबर २६२, काळे प्लॉट, शिवाजी कॉलेजच्या मागे, उमरगा, जिल्हा- उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले. त्याने मुद्देमालाबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. अधिक चौकशीनंतर त्याने चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्या ताब्यातून एकुण रोख रक्कम ५,५६,२००/-रू जप्त केले आहे. 

या गुन्ह्यातील आरोपी अत्तार हा पूर्वी फिर्यादी मोबाईल दुकानदार शेख यांच्या दुकानात कामाला होता. आरोपी यास अत्तार याला डान्सबार यासह इतर व्यसन जडले आहेत. त्याला मोबाईल दुकानदार शेख यांच्या घरी मोठी रक्कम मिळू शकेल याची खात्री असल्याने त्याने चोरी केल्याचे समोर आले आहे.

ही कामगिरी राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त, संतोष गायकवाड, सहा.पोलीस आयुक्त, विश्वनाथ सिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विकास देशमुख, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पथकामधील प्रविण चुंगे, अजय पाडवी, रविंद्र परबत, विनोद व्हटकर, कृष्णाथ बडुरे, सचिनकुमार लवटे, अजय चव्हाण, विनोद पुजारी, पंकज घाडगे, सुधाकर माने, तौसिफ शेख, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे यांनी केली आहे.