एमआयडीसी पोलीस ठाणे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

एमआयडीसी पोलीस ठाणे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

Solapur MIDC Police Station DB Branch News

सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्या, वाहन व मोबाईल चोरी रोखण्याकरीता पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे व सहा. पोलीस आयुक्त विभाग संतोष गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे राजन माने यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. 

त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई/विक्रम रजपूत यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार यांना आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने ०६/०९/२०२३ रोजी पोहेकॉ / ७४५ दिपक डोके यांना एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत निलम नगर भागात मंदिर चोरी करून दक्षिणा पेटी फोडणारे ४ व्यकी शांती नगर चौक, स्वागत नगर सोलापूर येथे येणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार यांनी वरील नमुद ठिकाणी सापळा लावून त्यांना ताब्यात घेत असताना त्यातील 1 आरोपी पळुन गेला व इतर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. अबरार रौफ शेख रा. नविन विडी घरकुल, प्रेम भास्कर कुणी रा. बोळकोटे नगर, बालाजी नागेश चिंता रा.नविन विडी घरकुल सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेले तिघेही कामगारांची मुलं असून एकमेकांचे मित्र आहेत. चोरी करणे आणि वेगवेगळी व्यसनी करणे हाच यांचा दिनक्रम आहे. 

ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे येथील तीन, विजापूर नाका पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतुन प्रत्येकी एक असे गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. या गुन्ह्यांमध्ये मंदिर चोरी, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

6 गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या मालापैकी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील निलम नगर भागातील मंदिरातील दक्षिणा पेटी फोडुन पळवुन नेलेली रोख रक्कम, तसेच मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १,७२,१००/- रू किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोनि / शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत, पोहेकॉ / १२७ राकेश पाटील, पोहेकॉ / ६२५ एकनाथ उबाळे, पोहेकॉ / ७४५ दिपक डोके, पोहेकॉ / १२६६ सचिन भांगे, पोना/ २७३ मंगेश गायकवाड, पोकॉ/१४६७ शैलेश स्वामी, पोकॉ/१६६४ अमोल यादव, पोकॉ/१६१८ सुहास अर्जुन, पोकॉ/१४८३ काशिनाथ वाघे, पोकॉ/१५८७ शंकर याळगी, पोकॉ/४०२ अमसिध्द निंबाळ, पोकॉ/१७३ देविदास कदम, पोकॉ/१४६९ दिपक नारायणकर यांनी बजावली आहे.

PSI Vikram Rajput News