शिवसेना शहर उत्तर विधानसभा समन्वयकपदी महेश धाराशिवकर

शिवसेना शहर उत्तर विधानसभा समन्वयकपदी महेश धाराशिवकर

Solapur-city-shivsena-mahesh-dharashivkar-news

सोलापूर : सोलापूर शहर शिवसेनेतर्फे नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. पक्षाच्या बैठकीत या निवडी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी जाहीर केल्या.

शासकीय विश्रामगृहावर शहर शिवसेनेची बैठक जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोलापूर शहर उत्तर विधानसभा समन्वयकपदी महेश धाराशिवकर यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच उपशहर प्रमुख म्हणून संजय गवळी, सिद्धाराम खजुरगी, रेवणसिद्ध पुराणिक, अमित भोसले आणि सुशील कन्नूरे यांचे नाव घोषित करण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांना फेटा बांधून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी या बैठकीस शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, दत्तात्रय वानकर, संतोष पाटील, अक्कलकोटचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, उपशहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, संजय साळुंखे, संताजी भोळे, रविकांत कांबळे, सुरेश जगताप, सचिन गंधुरे, सोमनाथ शिंदे, निरंजन बोद्धुल, धनराज जानकर, ब्रह्मदेव गायकवाड, सचिन माने, रेवण बुक्कानुरे, मोहसिन शेख, बालाजी विठ्ठलकर, चंद्रकांत मानवी, सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रमेश व्हटकर, दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख योगीराज पाटील, अक्कलकोट उपतालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, अतुल भवर, रविकांत गायकवाड, राज पांढरे आदी उपस्थित होते.

तसा मी संघटनेला मानणारा. साधारणतः 1987 साली सोलापुरातील पाणीवेस येथे शिवसेनेची  शाखा स्थापन झाली. शाखा प्रमुख कोण होते हे मला माहीत नाही, परंतु विलास चव्हाण त्यांचे सहकारी संजय पवार, पंडित हरसुरे, अंबादास जाधव व इतर अनेक यांच्यासह मी शाळकरी असल्यापासून शिवसेनेचे काम केले. कॉलेजमध्ये प्रताप भाऊ चव्हाण यांच्यासमवेत विद्यार्थी सेनेचे काम केले. त्यावेळी शिवसेनेचे फलक लावताना अगदी खड्डे मारण्यापासून मी काम केले व याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवसेनाप्रमुखांचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. यातून विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख ते विद्यार्थी सेनेचा संपर्कप्रमुख आदी पदे भूषवली. जीजी पदे शिवसेनेने मला दिली, त्या सर्व पदांना न्याय देण्याचा अथवा जनसामान्यांसाठी त्याचा उपयोग करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. असंख्य आंदोलनातून विद्यार्थी व जनसामान्य यांच्या वेदनांना वाचा फोडण्याचा अथवा न्याय देण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार वर्षापासून माझ्याकडे कसलेही पद नव्हते परंतु संघटनेचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मी कायम शिवसेनेच्या कार्यक्रमात अथवा आंदोलनाचा सहभागी होतो. कदाचित याचीच दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय पुरुषोत्तमजी बरडे, शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रतापभाऊ चव्हाण यांनी माझी सोलापूर शहर उत्तर समन्वयकपदी नेमणूक केली आहे. मी नम्रपणे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तमजी बरडे साहेब यांना विनंती केली होती की माझ्या जागी माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल तर त्याची नेमणूक करा. कारण मी शिवसेनेचा जबाबदार कार्यकर्ता आहे. पदाच्या जबाबदारीपेक्षा शिवसेनेची जबाबदारी माझ्यासाठी महत्त्वाची आहे परंतु साहेबांनी माझा आदेश आहे असे सांगितल्याने मी सदर जबाबदारी नम्रपणे स्वीकारत आहे. यापुढील काळात शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडेल. पद असले काय किंवा नसले काय हा विचार निष्ठावंत शिवसैनिक असल्याने मला कधीच पडत नाही.. व ही पोस्ट करताना मी कोणी मोठा लागून गेलेला नाही मी शेवटपर्यंत बाळासाहेबांचा सैनिक असेल खुर्ची साठी कधीही तडफडणार नाही याची ग्वाही देतो..

जय महाराष्ट्र जय शिवराय..

- महेश धाराशिवकर