सोलापूरच्या तरुणांनी रांगोळीतून साकारली 260 फुटांची दुर्गादेवी!
सोलापूर : युवा कलाकार विपुल मिरजकर आणि सह कलाकार यांनी दसऱ्याच्या सणाचे अवचित्य साधून (260X150 फूट) आकारात भव्य दिव्य मा दुर्गा देवीची पाषाण खडी आणि रंगांचा वापर करून प्रतिमा साकारली आहे. आणि लेक वाचवा ,बेटी बचाओ बेटी पढाओ व समाजात होणारे बलात्काराचे प्रकार थांबावे या साठी सुद्धा सामाजिक संदेश दिला आहे. या कलाकृती साठी आम्हाला 25 दिवसाचा कालावधी लागला. तसेच याची विश्वविक्रमा बुक साठी सुद्धा नोंदणी साठी अर्ज केला आहे.
जागतिक कोंरोना महामारीच्या काळात सर्व सण,उत्सव आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत. तरी मी आणि माझ्या सहकलाकारांनी मिळून एक वेगळ्या प्रकारे दसऱ्याच्या शुभ दिनी माँ दुर्गा देवीची प्रतिमा साकारून भारतवासीयांना शुभेच्छा देत आहोत.
कलाकार संघ:-
१) विपुल मिरजकर
२) प्रमोद दासरी
३) निखिल तलकोकुल
४) शुभम कामठी
५) आशिष रेगल
सपोर्टिंग टीम :-
१) कुचन प्रशाला सोलापूर
२) विशाल काळे ( शिक्षक , कुचन प्रशाला सोलापूर)
३) सागर सुब्रमणी भारती (अभियंता,विश्वविक्रमवीर )
४) परिवार
५) मित्र परिवार
टिप - कोंरोनाच्या जागतिक रोगामुळे सरकारने दिलेले सर्व नियम अटी मुळे लोकांना समक्ष पाहता येणार नाही, तरी आम्ही प्रसार माध्यम आणि सामाजीक माध्यमातुन या कलेचे सर्वाना साकारलेली कला दाखवू.
लागलेले साहित्य
1) पाषाण खडी - 24 ब्रास
2) रंग (5 रंग) - 150 लिटर