सोलापूर पोलीस गुन्हे वृत्त महाराष्ट्र राजकीय सामाजिक मनोरंजन वेब - स्टोरी पर्यावरण / पर्यटन
---Advertisement---

Viral Video : ‘आम आदमी’वर पोलीस रागावले!

On: June 24, 2025 8:32 AM
Follow Us:
---Advertisement---

Aam Aadmi Party Solapur Police Lathimar News

सोलापूर : विनापरवाना रॅली काढल्यानंतर जेलरोड पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या रॅलीत जाऊन कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी लहान मुले आणि कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याची तक्रार आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निलेश सांगेपाग यांनी केली आहे.

आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्षपदी जुबेर हिरापूर यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने सोमवारी सायंकाळी स्वागत रॅली काढण्यात आली होती. ही रॅली काढण्यासाठी आम आदमी पार्टीने पोलिसांकडे परवानगी मागितली मात्र परवानगी मिळाली नाही.

Viral Video

 

सोमवारी सायंकाळच्या सुमारास विजापूर वेस परिसरात रॅली निघाली होती. रॅलीला परवानगी नसल्याने पोलिसांनी रॅलीतील कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडे हिसकावून घेतले. त्याच झेंड्याच्या काठीने रॅली मधील कार्यकर्ते आणि लहान मुलांना लाठीमार केला अशी तक्रार आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निलेश सांगेपाग यांनी केली आहे.

रॅलीला परवानगी दिली नसेल तर पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. कोणाच्यातरी दबावाखाली येऊन कार्यकर्त्यांना लाठीमार करणे योग्य नाही. याबाबत आम्ही तक्रार करत आहोत.
– खतीब वकील,
आम आदमी पार्टी

आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना रॅली काढली होती. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना हाकलून लावले. बाकी काही नाही.
– शिवाजी राऊत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now