पर्यावरण / पर्यटन

अजित शिंदे, नागनाथ क्षीरसागर यांना सुवर्ण तर सुरेश कुर्ले यांना रजत पदक

Ajit Shinde, Nagnath Kshirsagar won gold and Suresh Kurle won silver 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : राज्य वन विभागतर्फे प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दलच्या सुवर्ण व रजत पुरस्कार मंगळवारी जाहीर झाले.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूरचे सहाय्यक वनसरंक्षक अजित शिंदे, उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वेक्षक नागनाथ क्षीरसागर यांना सुवर्ण पदक जाहीर झाले. तर, येथील वनरक्षक सुरेश कुर्ले यांना ‘रजत’ पारितोषिक जाहीर झाले आहे.

राज्यभरातील वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी भावी कामाबद्दल तसेच वन सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणाऱ्या पदकांची घोषणा नुकतीच करण्यात आली. राज्यभरातून आलेल्या सन २०२० ते २०२३ दरम्यानच्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय पदक निवड समितीची बैठक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

सहाय्यक वनसंरक्षक श्री. शिंदे यांना जुन्नर (पुणे) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामाबद्दल सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. वनरक्षक कुर्ले यांनी मोहोळ, करमाळा येथील मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासह, वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी केलेल्या कामासाठी पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे या पदक निवडीमध्ये मूळचे सोलापूरचे असणारे सद्या सातारा सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांनाही सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी अमरावती, गडचिरोली येथे केलेल्या कामाबद्दल त्यांना सुवर्णपदक जाहीर झाले. तसेच, जुन्नर (पुणे) येथील उवनसंरक्षक अमोल सातपुते यांनाही ‘रजत’ पदक जाहीर झाले आहे. जुन्नर येथील मानव बिबट संघर्ष कमी करण्यासह, लोक जागृतीबाबत सातपुते यांनी केलेल्या कामांची दखल घेऊन ‘रजत’ पुरस्कार मिळाला.

Related Articles

Back to top button