पर्यावरण / पर्यटन

पावसाळी भटकंती करून मिळवला खजिना!

andharban jungle trek eco friendly club

HTML img Tag Simply Easy Learning

इको फ्रेंडली क्लबचा उपक्रम; अंधारबन जंगल, कुंडलिका वॅली, खजिना डोंगर, ताम्हिणी घाट परिसरात ट्रेकिंग

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : ऐन पावसाळ्यात सोलापूर आणि परिसरात उन्हाळ्यासारखे वातावरण असताना इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी ताम्हिणी घाट आणि परिसरात मस्त पाऊस अनुभवला. अंधारबन जंगल, भीरा आणि पाटणूस परिसरात स्वर्गीय भटकंती केल्यानंतर खजिना मिळाल्याचा आनंद सर्वांना झाला.

निसर्ग पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या इको फ्रेंडली क्लबच्यावतीने (Eco Friendly Club) महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अंधारबन जंगलात भटकंतीचे (Andharban Jungle Trek) आयोजन करण्यात आले होते. सोबतच पाटणूस गाव परिसरातील खजिना डोंगरावर ट्रेकिंग करण्यात आले. दोन दिवसाच्या निसर्ग भटकंतीमध्ये सर्वांनी धबधबे आणि नदीमध्ये मस्त एन्जॉय केले.

9 ऑगस्ट रोजी रात्री सोलापुरातून प्रवासाला सुरुवात झाली. 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सोलापूर येथील निसर्गप्रेमी ताम्हिणी घाट परिसरातील पिंपरी गावात दाखल झाले. पिंपरी येथील हॉटेल्स ट्रेकर्स पॉईंटचे लक्ष्मण वाळंज यांच्याकडे फ्रेश होण्याची, चहा – नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व सूचना दिल्यानंतर स्थानिक गावकरी, गाईड विजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेकिंगला सुरुवात झाली.

धुक्यात हरवलेले जंगल, चिखलाने मळलेली पायवाट, उंचच उंच डोंगर कडे, डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहत घनदाट जंगलातून वाट काढत सर्व निसर्गप्रेमींनी अंधारबन जंगलात भटकंती केली. सर्वांनी दाट जंगलातील पाऊस अनुभवला.

घनदाट जंगलातून वाट काढत सर्व निसर्गप्रेमी दुपारी जेवणासाठी हिरडी गावात पोहोचले. अंधारबन ॲग्रो टुरिझमचे धीरज मेंगडे यांच्याकडे मस्त गावरान जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा एकदा ट्रेकिंगला सुरुवात झाली.

ट्रेकिंग दरम्यान सर्वांनी पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. सायंकाळी सर्वजण भीरा धरण परिसरात पोहोचले. नदी प्रवाहात सुरक्षितपणे मनसोक्त भिजण्याचाही आनंदही घेतला.

पाटणूस गावामध्ये पलांडे काकांच्या स्वामी कृपा हॉलिडे याठिकाणी मुक्कामाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पाटणूस गावातील कुलकर्णी ताई यांच्याकडे रात्रीचे मस्त जेवण केले.

11 ऑगस्ट रोजी सकाळी चहा – नाश्ता झाल्यानंतर सर्वजण पाटणूस परिसरातील खजिना डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी रवाना झाले. याठिकाणी पर्यावरण अभ्यासक, मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले पाटणूस गावात शिक्षक राम मुंडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. मुंडे सरांनी खजिना डोंगर, पाटणूस गाव, परिसरातील जैवविविधता, पक्षीवैभव, प्राणीवैभव याची रंजक माहिती सर्वांना सांगितली. मुंडे सरांचे मार्गदर्शन ऐकून सर्वजण आनंदून गेले.

त्यानंतर सर्वांनी त्या परिसरातील धबधब्यात सुरक्षितपणे भिजण्याचा आनंद घेतला.

पुन्हा कुलकर्णी ताई यांच्याकडे दुपारच्या जेवणाची व्यवस्था होती. दुपारच्या जेवणानंतर निसर्गप्रेमींचा ताफा बसमधून ताम्हिणी घाटाच्या दिशेने निघाला.

ताम्हिणी घाटात थांबून सर्वांनी दूर दूरपर्यंत पसरलेल्या हिरवाईचा आनंद घेतला. यावेळी सर्वांनी गरमागरम मक्याचे कणीस, भजी, मॅगी आणि चहाचा आस्वाद घेतला. परतीच्या प्रवासात पुणे परिसरात बगीचा हॉटेल या ठिकाणी रात्रीचे जेवण सर्व मंडळी 12 ऑगस्ट रोजी पहाटे सोलापुरात दाखल झाली.

इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, समन्वयक सटवाजी (अजित) कोकणे, संतोषकुमार तडवळ यांनी भटकंतीचे नेतृत्व केले.

अंधारबन जंगल भटकंतीमध्ये सुनील थिटे, गिरीश घोगले, सौ.उमा गिरीश घोगले, दुर्गा थिटे, मनीषा वासकर, स्वाती मोरे, गौरी मोरे, गौरी खिस्ते, अश्विनी लांबतुरे, सविता जाधवर, अनिता वागडकर (कोल्हापूर), सौ.वैशाली सरतापे, सिद्धी सरतापे, अनूप दोशी, परम गांधी, डॉ. आदिती धरणे, रेखा राजमाने, जालिंदर जगताप, संजय सुपाते, पोलीस अंमलदार दिपक राऊत, राजश्री दीपक राऊत, रविकांत सुरवसे, ॲड. अजिंक्य मगर, वीरभद्र स्वामी, एलआयसीचे अधिकारी प्रफुल्लकुमार साखरे, सुनीता साखरे, रजनी कंदीकटला, उद्योजिका निर्मला धुमाळ, सिद्राम माणेकरी, उद्योजक अतुल धुमाळ, सई धुमाळ, महेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश आगलावे, डॉ. हर्षदा आगलावे, राही महेश आगलावे, माही महेश आगलावे, गंगुबाई कोकणे, चैतन्य रकळे, श्लोक सुरवसे, समर्थ जाधव, आदिती अविनाश देवडकर, नेहा कुलकर्णी, गायत्री केसकर, अपूर्वा कंदीकटला, पूजा कोकणे आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते.

चडचणकर ट्रॅव्हल्स सोमनाथ चडचणकर आणि जगदीश चडचणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक समीर मस्के, सहाय्यक प्रमोद गुमटे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button