गुन्हे वृत्त

गुंड अर्जुन सलगरला येरवड्यात पाठवलं!

Arjun Salgar Crime Branch Yerwada Jail News

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारा, जागा बळकावणारा सराईत गुंड अर्जुन सलगर याच्यावर स्थानबध्द कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जुन सलगर याची थेट येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर शहरातील फौजदार चावडी व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अर्जुन सिद्राम सलगर, (वय ४५ वर्षे, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, आगळकी करणे, कट रचणे, जागा बळकावणे, चोरी करणे, विनयभंग करणे, धाकदपटशा करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द सोलापुर शहर पोलीस आयुक्तालयात एकुण १४ गुन्हे दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अर्जुन सिद्राम सलगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

अर्जुन सिद्राम सलगर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०११ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार व क.३ एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य त्याचे साथीदारांच्या मदतीने संघटीतपणे चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.३१/१०/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्याची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आहे.

सदरची कारवाई ही एम. राज कुमार, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अरविंद माने, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, एमपीडीए पथकातील सपोनि/तुकाराम घाडगे व अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकों/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.

कोण आहे अर्जुन सलगर?

– अर्जुन सलगर हा धाराशिव लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीचा 2019 सालचा उमेदवार राहिलेला आहे.

– सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेले हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप आहे.

– अर्जुन सलगरवर एकूण 14 गुन्हे दाखल असून यापूर्वी खंडणी मागणे, बेकायदेशीर जागा बळकवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वी त्याला एक वर्ष एमपीडीए अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून एक वर्ष येरवडा कारागृहात ठेवले होते.

Related Articles

Back to top button