पोलिसांचा झटका! जागेचा अवैध ताबा घेणाऱ्यांना कोठडी
Arjun Salgar Sujit Khurd Arrest Crime Branch News
सोलापूर : आपल्या राजकीय आणि सामाजिक वलयाचा उपयोग करून जागेचा अवैधरित्या ताबा घेतल्याबद्दल सोलापुरातील तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
अर्जुन सिद्राम सलगर (वय-४४ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा. घर नं-१०, प्रेरणा सोसायटी, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), सुजीत लक्ष्मण कोकरे (वय-२९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. घर नं-७८, हनुमान मंदिरा जवळ, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), सुजीत दत्तात्रय खुर्द (वय-२८ वर्षे, व्यवसाय कंन्ट्रक्शन, रा. घर नं-११७/१४९ ए. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
फौजदार चावडी चावडी पोलीस ठाणे हद्दीतील नवीवेस पोलीस चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानचे मेलगिरी दुकान व वॉकवे फुटवेअर शॉप या दरम्यानचे टी.पी. स्किम नं-२, फायनल प्लॉट नं- ३/ए१ मधील ५९० स्क्वे. फुट जागेचा दि.२८/०७/२०२४ रोजी ००.३० वा. ते ०३.३० वा. चे दरम्यान डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे, व त्याचे इतर ०२ ते ०३ साथीदार यांनी संगनमताने कट रचून घेतला, सदरचा बेकायदेशीर ताबा घेताना सदर जागेतील पुजा हॉटेल एका जे.सी.बी.चे सहायाने पाडुन, त्या हॉटेल मधील अंदाजे रु.१,५०,०००/- किंमतीचे साहित्य चोरून नेले.
याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे विविध कलमांसह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चा सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (g) अन्वये गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचे तपासामध्ये डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजीत खुर्द, सुजीत कोकरे व त्यांचे इतर ०२ ते ०३ साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे गुन्ह्याचे तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी आज रोजी आरोपी अर्जुन सिद्राम सलगर (वय-४४ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा. घर नं-१०, प्रेरणा सोसायटी, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), सुजीत लक्ष्मण कोकरे (वय-२९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. घर नं-७८, हनुमान मंदिरा जवळ, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर), सुजीत दत्तात्रय खुर्द (वय-२८ वर्षे, व्यवसाय कंन्ट्रक्शन, रा. घर नं-११७/१४९ ए. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर) यांना गुन्ह्यात अटक केली. आरोपींना, विशेष न्यायालय, सोलापूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.
आरोपी नामे अर्जुन सिद्राम सलगर, सुजीत लक्ष्मण कोकरे हे सोलापूर शहरातील पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. तरी पोलीसांकडून नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे की, वर नमुद आरोपींनी बेकायदेशीररित्या जमिनीचा ताबा घेतला असेल तर याबाबत पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी केले आहे.
या गुन्ह्याचा तपास एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर हे करीत आहेत.
कोण आहेत सलगर आणि खुर्द?-
– सुजित खुर्द हा शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचा प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे
– तर अर्जुन सलगर हा धाराशिव लोकसभेचा वंचित बहुजन आघाडीचा 2019 सालचा उमेदवार राहिलेला आहे.
– यामध्ये विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे आणि इतर पाच साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
– सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेले हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप आहे.
– अर्जुन सलगरवर एकूण 14 गुन्हे दाखल असून यापूर्वी खंडणी मागणे, बेकायदेशीर जागा बळकवणे असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वी त्याला एक वर्ष एमपीडीए अर्थात झोपडपट्टी दादा म्हणून एक वर्ष येरवडा कारागृहात ठेवले होते.